आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Inspiration From The Husband; Now In The Role Of Captain In The Women's League

पतीकडून प्रेरणा:आता महिला लीगमध्ये कर्णधाराच्या भूमिकेत

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटपटू पती मिशेल स्टार्कची आयपीएलमधील कामगिरी मला सातत्याने प्रेरणादायी ठरली. यामुळे मला क्रिकेटमध्येच करिअर करण्याची संधी मिळाली. यासाठी स्टार्कने केलेल्या मार्गदर्शनातून मला क्रिकेटमध्ये यशाचा माेठा पल्ला गाठता आला, अशी प्रतिक्रिया एलिसा हिलीने दिली. ती सध्या महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वाॅरियर्ज संघाचे नेतृत्व करत आहे. तिच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांमध्ये दाेन विजय साजरे केले आहे. ‘लहानपणी मला अजिबात क्रिकेट आवडत नव्हते. मात्र, काका नेहमीच मला हे खेळण्यासाठी प्राेत्साहन देत हाेते. तरीही मी याबाबत कधीही सकारात्मक विचार केला नाही. मात्र, त्यानंतर मला याची गाेडी लागली. तसेच माझे लग्नही क्रिकेटपटू असलेल्या स्टार्कशी झाले. यानंतर माझ्यातील क्रिकेटपटूला चालना मिळाली. यातून मला टी-२० आणि वनडे वि‌श्वचषकामध्ये सहभागी हाेण्याची संधी मिळाली, असेही तिने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...