आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा स्पर्धा:10 ऑक्टाेबरपासून आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ वर्षासाठीचा आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेला १० ऑक्टोबरपासून बीड येथे क्रॉसकंट्रीने स्पर्धेने प्रारंभ होईल, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी दिली. स्पर्धेच्या कार्यक्रम विद्यापीठा अंतर्गत सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आला आहे. इच्छूक खेळाडूंनी महाविद्यालामार्फत स्पर्धेत सहभाग घ्यावा. अॅथलेटिक्स आणि क्रॉसकंट्री खेळासाठी खेळाडूंना वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक राहिल. अखिल भारतीय विद्यापीठ महासंघाच्या नियमानुसार या स्पर्धा होती. या स्पर्धेसाठी जिल्हा समन्वयाची नेमणूक करण्यात आली असुन, औरंगाबादसाठी डॉ. युसुफ पठाण, जालन्यासाठी डॉ. भुजंग डावकर, बीडसाठी डॉ. पांडुरंग रनमाळ व उस्मानाबादसाठी डॉ. उमेश सलगर यांची नेमणूक केली आहे. स्पर्धेच्या नियोजनासाठी विद्यापीठ क्रीडा विभागातील डॉ. मसूद हाश्मी, प्रा. अभिजीत दिक्कत, किरण शूरकांबळे, सुरेंद्र मोदी, रामेश्वर विधाते, मोहन वाहील्वार आदी प्रयत्नशील आहेत.

बातम्या आणखी आहेत...