आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्‍पर्धा:देवगिरी महाविद्यालयास चौथ्यांदा विजेतेपेद

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथील वैजनाथ महाविद्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत परळी वैजनाथ येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे देवगिरीने सलग चैथ्यांदा अजिंक्यपद आपल्या नावे केले. कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या संघांना वैजनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. मेश्राम यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. पी. एल. कराड, पी. व्ही. बेंदसुरे, व्ही. एल. फड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधी अभिजित दिक्कत, निवड समिती सदस्य सचिन पगारे, डॉ. उदय डोंगरे, डॉ. संदीप जगताप, गोकुळ तांदळे आणि डॉ.पंढरीनाथ रोकडे आदींची उपस्थिती हाेती.

रोहित, राजेश चमकले स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देवगिरी महाविद्यालयाच्या संघाने कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयाच्या संघास १२-३ होमरनांच्या फरकाने पराभूत केले. सुरुवातीला दोन्ही संघात रोमांचक सामना होईल असे वाटत होते, मात्र हा सामना एकतर्फी झाला. फायनलमध्ये अरोहित तुपारे, रोहित शेळके, सत्यम राठोड, अक्षय चव्हाण, बळीराम जगताप, आकाश राऊत आणि राजेश काळे या खेळाडूंनी उत्कृष्ट पिचिंग व हीटिंग करत आपल्या संघांसाठी चांगली कामगिरी केली. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी लवकरच संघ जाहीर केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...