आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • International cycling day shiv chhatrapati award winner cyclist on lockdown corona self practice and health

वर्ल्ड सायकल डे :सकारात्मक विचारातून मेहनत करा, लवकरच सायकल ट्रॅकवर शिवछत्रपती पुरस्कार विजेती सायकलिस्ट मधुरा वायकरचा युवांना सल्ला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रेनिंग बंद असले तरी इंप्रूव्हमेंटपेक्षा फिटनेस कायम ठेवण्यावर द्या लक्ष, व्हिडिओमध्ये पाहा...

(एकनाथ पाठक)

कोरोनाच्या संकटामुळे सध्या देशभरातील स्पोर्ट्स इव्हेंट बंद आहेत. मात्र, आपण सकारात्मक विचारातून सातत्याने प्रचंड मेहनत करा. लवकरच आपण सर्व जण मैदानावर परतणार आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला आपण घरात राहून आरोग्याची काळजी घ्या. यातूनच आपल्याला निश्चित केलेल्या ध्येयाचा पल्ला सहजपणे गाठता येईल, असा सल्ला आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मधुरा वायकरने दिला. आंतरराष्ट्रीय सायकल दिवसानिमित्त दिव्य मराठीशी बोलताना मधुराने कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावे, असेही सांगितले.


फिटनेस कायम ठेवणे महत्त्वाचे

लॉकडाऊनमुळे सध्या सर्वच खेळाडू घरी आहेत. अशात आता आपण सर्वांनी फिटनेस कायम ठेवणे महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरेल. सध्या सर्वच इव्हेंटच्या खेळाडूंची ट्रेनिंग पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे प्रत्यक्षात मैदानावर आणि ट्रॅकवर उतरल्यानंतर आपल्याला कामगिरीचा दर्जा कायम ठेवण्यासाठी याच फिटनेसचा मोठा फायदा होइल, असेही मधुराने सांगितले.


छंदांना मिळाला वेग

सायकलिंगमध्येच करिअर करत असताना माझे आपल्या छंदांकडे दुर्लक्ष झाले. हे जोपासण्यासाठीचा वेळच मिळत नव्हता. मात्र, आता लॉकडाऊनमुळे मी घरीच आहे. अशात मी आवडत्या सर्व गोष्टी करत आहे. त्यांना आवर्जुन वेळ देत आहे. यातील आनंदही काही वेगळाच ठरत आहे. आईला मदत करण्यासाठीही माझा आता पुढाकार असतो, असेही ती म्हणाली.

0