आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरनॅशनल शुटर:लॉकडाऊनमध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाज शगुन करतेय सेंद्रिय शेती

जयपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येणाऱ्या काळात फार्म हाऊसमध्ये नेमबाजी रेंज बनवू इच्छिते

संजीव गर्ग

आंतरराष्ट्रीय नेमबाज शगुन चौधरी लॉकडाऊनमुळे सरावापासून दूर आहे. त्यामुळे तिने सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. जयपूर येथील फार्म हाऊसवर शगुन सात महिलांसह लसूण, टोमॅटो, भेंडीची शेती करत आहे. सेंद्रिय किन्नू फार्म असून तेथे ८०० झाडे आहेत. तिने म्हटले, नेमबाजीमुळे मी अशा प्रकारचे काम करू शकत नव्हते.   लॉकडाऊनमध्ये महिलांसोबत मिळून काम करतेय. मी या महिलांना आत्मनिर्भर बनवू इच्छिते. किन्नूनंतर आम्ही भाज्यांची खासगी व्यवसायाची तयारी करत आहोत.  

शगुनने म्हटले की, सेंद्रिय वस्तूंचा वापर वाढत आहे हे लोकांसाठी फायद्याचे आहे. मी १७ वर्षांपासून नेमबाजी करतेय. अशात येणाऱ्या काळात फार्म हाऊसमध्ये नेमबाजी रेंज बनवू इच्छिते. कारण, कामासोबत सरावदेखील करता येईल. २०१२ मधील लंडन ऑलिम्पिकमध्ये उतरलेल्या ३६ वर्षीय या खेळाडूंच्या मते, या खेळात वयाला महत्त्व नाही. हा वैयक्तिक खेळ आहे. यात सोशल डिस्टन्सिंग ठेवता येऊ शकते. अशात  सरावासाठी सूट हवी.

बातम्या आणखी आहेत...