आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि गरवारे कम्युनिटी सेंटरच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त योगासन स्पर्धेचे ११ मार्च रोजी कम्युनिटी सेंटर एन-७ सिडको येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत वरिष्ठ महिला अ २८ ते ३५ वर्षे गट, वरिष्ठ महिला ब ३६ ते ४५ वर्षे गट व वरिष्ठ क ४६ ते ५५ वर्षे गटात स्पर्धक आपले कौशल्यपणाला लावतील. या स्पर्धा राष्ट्रीय योगासन संघटनेच्या नियमानुसार होतील. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी लता लोंढे, शिल्पा अस्वलीकर व राष्ट्रीय पंच छाया मिरकर यांच्याशी संपर्क साधावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.