आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Ipl 2020, Kolkata Coach McCallum Said Russell Can Bat In Tip Order, Expectations From Morgan In Middle Order

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल 2020:केकेआरचे कोच ब्रेंडन मॅक्कुलम म्हणाले- टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्यास आंद्रे रसेल सक्षम, तर मिडल ऑर्डरसाठी इयान मॉर्गनकडून आशा

दुबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रसेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 186 पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने 1 हजार 400 धावा केल्या आहेत

आयपीएल 2020 ची सुरुवात झाली आहे. शनिवारी अबुधाबीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियंसचा पराभव केला. आता मुंबईचा पुढील सामना कोलकाता नाइट राइडर्ससोबत होणार आहे. कोलकाताचे कोच ब्रेंडन मॅक्कुलमने सांगितले की, आंद्रे रसेलला बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रमोट केले जाऊ शकते.

शेवटच्या दहा ओव्हरमध्ये रसल घातक

मीडियाशी बातचीतदरम्यान मॅक्कुलम म्हणाला की, "आमच्याकडे मजबुत संघ असल्याचा आम्हाला गर्व आहे. त्या-त्या सामन्यांच्या हिशोबाने आम्ही आमच्या पर्यायांचा उपयोग करू. रसेलने मागच्या सीजनमध्ये 50 पेक्षा जास्त षटकार ठोकले होते. रसेलचा खेळ, टी-20 च्या अखेरच्या 10 ओव्हरमध्ये सर्वात घातक असतो. त्यामुळे त्याला टॉप ऑर्डरमध्ये आणले जाऊ शकते.” मॅक्कुलमने पुढे सांगितले की, इंग्लँडचा वर्ल्ड कप विनर कर्णधार इयोन मोर्गनच्या येण्याने मिडल ऑर्डरदेखील मजबुत झाला आहे.”

आतापर्यंत कसे होते रसेल, कार्तिक आणि मॉर्गनचे आयपीएल करियर

रसेलने आतापर्यंत 64 सामन्यात 186.41 च्या स्ट्राइक रेटने 1 हजार 400 धावा केल्या आहेत. त्यात त्याने 96 चौकार आणि 120 षटकार लगावले आहेत. मॉर्गनने आयपीएल करियरमध्ये 52 सामन्यात 121.13 च्या स्ट्राइक रेटने 854 रन केले आहेत. यात 72 चौकार आणि 34 षटकार आहेत. कार्तिककडे या दोघांपेक्षा जास्त अनुभव आहे. कार्तिकने आयपीएलमध्ये आतापर्यंत 182 मॅचमध्ये 129.8 च्या स्ट्राइक रेटने 3 हजार 654 रन केले आहेत. यात 357 चौकार आणि 101 षटकार आहेत. तसेच, कार्तिकने आतापर्यंत 18 अर्धशतके लगावली आहेत.

बातम्या आणखी आहेत...