आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2020 Latest News Updates: Chennai Super Kings CSK Team Staff Members Test COVID 19 Positive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलवर कोरोनाचे सावट:चेन्नई सुपरकिंग्स संघातील एका भारतीय खेळाडूसह 12 स्टाफ मेंबर्स कोरोना पॉझिटिव्ह

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुबईमध्ये 19 सप्टेंबरपासून आयपीएलची सुरुवात होईल, चेन्नईची टीम 21 ऑगस्टला दुबईत पोहचली होती

कोरोनामुळे अनेक दिवसांपासून लांबणीवर पडत असलेला आयपीएल टुर्नामेंट अखेर दुबईमध्ये पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. परंतू, यापूर्वीच एक मोठी माहिती समोर आली आहे. युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अद्याप संघाकडून याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संघातील एखा भारतीय गोलंदाजाला कोरोनाची लागण झाली आहे, पण खेळाडूचे नाव कळू शकले नाही. सध्या चेन्नई संघात शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, केएम आसिफ आणि मोनू कुमार, हे भारतीय गोलंदाज आहेत.

7 दिवस क्वारंटाइनमध्ये होता संघ

दुबईमध्ये आयपीएलची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होत आहे. चेन्नई संघ 21 ऑगस्टलाच दुबईत पोहचला होता. यानंतर सात दिवस सर्व संघ क्वारंटाइन होता. शुक्रवारपासून संघाला सराव सुरू करायचा होता, पण आता संघातील खेळाडू आणि स्टाफमधील 12 जणांना कोरोनाचील लागण झाल्याचे समोर आल्याने सराव थोडा उशीराने सुरू होईल.

यूएईत जाण्यापूर्वी भारतीयांच्या पाच चाचण्या झाल्या होत्या

यूएईला जाण्यापूर्वी आयपीएलमध्ये भाग घेत असलेल्या भारतीय खेळाडू आणि स्टाफची पाच वेळा चाचणी झाली होती. सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच सर्वांना दुबईला पाठवले होते. परदेशी खेळाडूंनाही दुबईत येण्यापूर्वी 14 दिवस क्वारंटाइन केले होते आणि चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच दुबईला पाठवले होते.