आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2020; Mumbai Vs Chennai Super Kings, FIRST MATCH OF Ipl 2020, News And Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MI vs CSK:चेन्नईने उघडले विजयाचे खाते, 5 गड्यांनी सुपर विजय; मुंबईचा नवव्यांदा सलामीला पराभव

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीएसकेमध्ये चार परदेशी खेळाडू शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, सैम करन, लुंगी एनजिडी आहेत
  • मुंबई इंडियंसमध्ये क्विंटन डिकॉक, कीरोन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पेटिसन आहे

यशस्वी कर्णधार मानल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धाेनीच्या कुशल नेतृत्वात गत उपविजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने १३ व्या सत्राच्या आयपीएलला धडाकेबाज विजयाने सुरुवात केली. धाेनीच्या चेन्नई संघाने सलामीच्या सामन्यात शनिवारी गतचॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केले. चेन्नईने १९.१ षटकांत ५ गड्यांनी विजय संपादन केला. मुंबईचा पुढील सामना २८ सप्टेंबर राेजी काेहलीच्या बंगळुरूविरुद्ध हाेणार आहे. मुंबईने आता नवव्यांदा सलामी सामना गमावला आहे.

राेहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १६२ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात चेन्नई संघाने ५ गड्यांच्या माेबदल्यात चार चेंडू शिल्लक असताना विजयश्री खेचून आणली. संघाच्या विजयामध्ये फाफ डुप्लेसिस (नाबाद ५८) आणि अंबाती रायडू (७१) यांच्या अर्धशतकी खेळीचे माेलाचे याेगदान राहिले. धाेनीला धावांचे खाते उघडता आले नाही. त्याने ४३७ दिवसांनंतर मैदानावर पाय ठेवला आहे. आता चेन्नई संघाने यंदाचा किताब जिंकण्याचा मानस व्यक्त केला आहे.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

मुंबईकडून हार्दिकने सलग 2 षटकारासह मैदानावर वापसी केली, पण 15 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर क्रुणाल पांड्याही झेलबाद झाला. यानंतर पोलार्डही धोनीकडे झेलबाद झाला आहे. सौरभ तिवारीही 42 रन काढून रविंद्र जडेजाच्या बॉलवर आउट झाला. फाफ डु प्लेसिसने बाउंड्रीवर दोन शानदार झेल घेतल्या.

कोरोनाला हरवणाऱ्या दिपकने केली पहिली ओव्हर

कोरोनाला हरवणाऱ्या दिपक चाहरने सामन्याची पहिली ओव्हर केली. पहिल्या ओव्हरमध्ये मुंबईने 12 धावा केल्या. टुर्नामेंट सुरू होण्यापूर्वीच सीएसके टीममधील दीपक आणि रितुराज गायकवाडसह 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यातील रितुराज सोडून सर्वजण ठीक झाले.

सीएसकेमध्ये चार परदेशी खेळाडू शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, सैम करन, लुंगी एनजिडी आहेत. तर, मुंबई इंडियंसमध्ये क्विंटन डिकॉक, कीरोन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पेटिसन आहे.

एकीकडे मुंबईने 4 वेळा आयपीएल किताब आपल्या नावे केला आहे तर दुसरीकडे चेन्नईने 3 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. जेव्हा जेव्हा आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईचे संघ समोरासमोर असतात तेव्हा क्रिकेटचा रोमांच शिगेला पोहोचला असतो. आयपीएल कोरोनामुळे भारताबाहेर होत असला तरी आयपीएलचा रोमांच कमी होणार नाही.

चेन्नई टीममध्ये ब्रावोला जागा मिळाली नाही

चेन्नई टीममध्ये वेस्टइंडीजचा ऑलराउंडर ड्वेन ब्रावोला जागा मिळाली नाही. ब्रावोच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. यापूर्वी झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) च्या फायनलमध्येही ब्रावोने गोलंदाजी केली नव्हती.

यापूर्वीच्या लढत

आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव करून चौथ्यांदा विजेतेपद मिळविले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे, तर धोनीच्या नेतृत्वात प्रत्येक वेळी सीएसके यशस्वी झाला आहे. दोन्ही संघांमधील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईला प्रत्येक वेळी प्लेऑफ खेळण्यात यश आले आहे. 2016-17 मध्ये चेन्नई सुपर किंग्जवर 2 वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. सीएसकेने आयपीएलमध्ये 5 वेळा उपविजेतेपद मिळवले आहे.

दोन्ही संघाचा रेकॉर्ड

आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांत 28 सामने झाले असून त्यामध्ये 11 सामने चेन्नईने, तर मुंबईने 17 सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये चेन्नईवर दबाव टाकण्यात मुंबई नेहमीच यशस्वी झाली आहे.

दोन्ही संघ

मुंबई इंडियंस: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कीरोन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, जेम्स पैटिंसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

चेन्नई सुपरकिंग्स: शेन वॉटसन, मुरली विजय, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायडू, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, विकेटकीपर), केदार जाधव, रविंद्र जडेजा, पीयूष चावला, दीपक चाहर, सैम करन, लुंगी एनगिडी.

बातम्या आणखी आहेत...