आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2020 News And Update; CSK Owner N Srinivasan Angry With Suresh Raina

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरेश रैना भारतात का परतला?:'कधी-कधी यशाची हवा तुमच्या डोक्यात जाते'; सुरेश रैनावर सीएसके संघाचे मालक एन श्रीनिवासन नाराज

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएलपूर्वीच चेन्नई संघातील 2 खेळाडून आणि 11 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कोरोनामुळे यावर्षी यूएईमध्ये होत आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलपूर्वीच महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (सीएसके)दोन मोठे धक्के बसले आहेत. पहिला म्हणजे, संघातील 2 खेळाडू आणि 11 कर्मचारी कोरोना संक्रमित आढळले. दुसरा म्हणजे, सुरेश रैनाने अचानक आयपीएलमधून माघार घेतली आणि भारतात परतला. रैनाने आयपीएल का सोडले याचे कारण अद्याप समजू शकले नसले, तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, कर्णधार महेंद्र सिंह धोनीला मिळालेल्या हॉटेल रुमसारखी रुम न मिळाल्याने रैना नाराज आहे आणि त्यामुळेच तो परतला आहे.

दरम्यान, सीएसके संघाचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन रैनाच्या आयपीएल सोडण्यावर नाराज आहेत. यावर ते म्हणाले की, लवकरच रैनाला कळेल की, तो काय गमवतोय.

'कधीकधी यशाची हवा तुमच्या डोक्यात जाते'

श्रीनिवासन यांनी आउटलुकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ''खेळाडू स्वतःला खूप खास समजत असतात, जसे जुन्या काळातील अभिनेते स्वतःला समजायचे. चेन्नई सुपर किंग्स एका कुटुंबासारखे आहे, यात सर्वजण एकत्र राहतात. रैनाला लवकरच कळेल की, तो काय गमवत आहे. चेन्नईच्या संघातील सर्व खेळाडू एका परिवारासारखे राहतात. पण जर तुम्ही खुश नसाल तर तुम्ही परत जाऊ शकता. मी कधीही कोणावरही जबरदस्ती करत नाही, कधीकधी यशाची हवा तुमच्या डोक्यात जाते.''