आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2020 News And Updates;Former RCB Coach Ray Jennings Said Kohli At Times Backed The Wrong Players

कोहलीवर माजी प्रशिक्षकाचा आरोप:कोहलीने माझे कधीच ऐकले नाही, चुकीच्या खेळाडूंची निवड केल्यामुळे संघाला एकदाही आयपीएल जिंकता आला नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रे जेनिंग्स म्हणाले की, आरसीबीचा प्रशिक्षक असताना मला बर्‍याच खेळाडूंना संधी द्यायची इच्छा होती, परंतु कोहलीची विचारसरणी वेगळी होती
  • रे जेनिंग्ज प्रशिक्षक प्रशिक्षक असताना आरसीबीने 2009 आणि 2011 मध्ये आयपीएलची फायनल खेळली होती, परंतु जेतेपद जिंकू शकले नाही

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चे माजी प्रशिक्षक रे जेनिंग्सने विराट कोहलीवर आरोप लावला आहे की, विराट त्यांच ऐकत नव्हता आणि चुकीच्या खेळाडूंना संघात स्थान द्यायचा. यामुळे आरसीबी एकदाही चॅम्पियन बनू शकला नाही. एका क्रिकेट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जेनिंग्जने ही माहिती दिली.

जेनिंग्स 2009 ते 2014 पर्यंत आरसीबीचे प्रशिक्षक होते. त्यांच्या कोचिंगमध्येच संघ 2009 आणि 2011 मध्ये फायलनपर्यंत गेला होता. परंतू, दोन्हीवेळा संघाला टुर्नामेंट जिंकला आला नाही.

विराटचे संघाबद्दल वेगळे विचार होते: जेनिंग्स

जेनिंग्सने सांगितले की, मी प्रशिक्षक असताना संघात 20-25 खेळाडू होते. प्रशिक्षक म्हणून त्या सर्वांवर लक्ष ठेवण्याची माझी जबाबदारी होती. पण विराटचा वेगळाच प्लॅन असायचा. अनेकदा तो संघात चुकीच्या खेळाडूंची निवड करायचा. मी जेव्हा कोच होतो, तेव्हा इतर खेळाडूंनाही संधी देण्याचा विचार करत होते. पण, विराट तसे करत नव्हता. आता या गोष्टींना काही अर्थ नाही. मी आशा व्यक्त करतो की, यावेळेस विराटचा संघ टुर्नामेंट जिंकले.