आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीसीसीआयने रविवारी आयपीएल सीजन-13 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनादरम्यान आयपीएल प्रेक्षकांशिवाय यूएईत 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. पहिला सामना डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान होईल. तसेच, फायनल 10 नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी असेल. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा फायनल रविवारऐवजी मंगळवारी होत आहे.
टूर्नामेंटमध्ये 10 डबल हेडर म्हणजेच एका दिवसात 2-2 मॅच होतील. संध्याकाळी होणारे सामने जुन्या शेड्यूलच्या अर्ध्या तासापूर्वी म्हणजेच, 7.30 पासून आणि दुपारचे सामना 3.30 वाजेपासून सुरू होतील.
प्रत्येक संघासोबत फक्त 24 खेळाडू असतील
आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने कोरोनामुल् प्रत्येक टीमला फक्त 24 खेळाडू सोबत नेण्याची परवानगी दिली आहे. याआधी फ्रेंचाइजीला 25 खेळाडू ठेवण्याची परवानगी होती. टूर्नामेंटमध्ये अनलिमिटेड कोरोना सब्सटिट्यूटला मंजूरी देण्यात आली आहे. म्हणजेच, टूर्नामेंटमध्ये एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, टीम त्याजागी दुसरा खेळाडू मैदानात उतरवू शकते.
सर्व 60 सामने तीन स्टेडियममध्ये होतील
आयपीएल मधील सर्व 60 सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाहमध्ये खेळवले जातील. भारतात आयपीएलचे सामने 8 ठिकाणी व्हायचे. फक्त तीन ठिकाणी सामने होत असल्यामुळे यावर्षी भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सींगवर नजर ठेवणे सोपे जाईल. ही गोष्ट काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिट (एसीयू)चे हेड अजीत सिंहने म्हटली होती.
यावेळेस नवीन काय असेल ?
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.