आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2021 Coronavirus Update | KKR Team Player Nitish Rana Test Positive For COVID 19

IPL वर कोरोनाचे सावट:टूर्नामेंटच्या 8 दिवसांपूर्वी KKR चा खेळाडू नितीश राणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, गोव्यातून परतल्यानंतर टीममध्ये झाला होता दाखल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नितीश मुंबईतील टीम हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) वर कोरोनाचे सावट आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा खेळाडू नितीश राणाला 14 वा सीजन सुरू होण्याच्या 8 दिवस आधीच कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गोव्यातील सुट्टीनंतर राणा संघात दाखल झाला. त्यांचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला, परंतु BCCI आणि KKR कडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश मुंबईतील टीम हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली तो आहे. आयपीएलचा 14 वा सीजन 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. अंतिम सामना 30 मे रोजी होईल. पहिला सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात खेळला जाणार आहे. केकेआरचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबादशी 11 मार्चला आहे.

मागील सीजनमध्ये नितीशने 254 धावा केल्या
नितीशने गेल्या वर्षी KKR साठी 14 सामन्यांत 25.14 च्या सरासरीने 254 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 60 सामन्यात त्याने 28.17 च्या सरासरीने 1437 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 135.56 आहे.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये 5 व्या क्रमांकावर होता
नुकत्याच पार पडलेल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत विजय हजारे ट्रॉफीमध्ये नितीश 5 व्या क्रमांकावर होता. दिल्लीकडून खेळत त्याने 7 सामन्यात 66.33 च्या सरासरीने 398 धावा केल्या. एक शतक आणि दोन अर्धशतकेदेखील ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट 97.78 होता.

टीमने सराव सुरू केला, अनेक खेळाडूंचे फोटो देखील शेअर केले
जवळपास सर्वच खेळाडू KKR संघात सामील झाले आहेत. शुबमन गिल, कमलेश नागरकोटी, शिवम मावी या खेळाडूंनी प्रशिक्षण घेताना फोटोही शेअर केले आहेत. अँड्रे रसेल, कॅप्टन ओएन मॉर्गन, दिनेश कार्तिक आणि सुनील नरेन हेदेखील KKR च्या सोशल मीडिया साइट्सवर सराव करताना दिसले आहेत, पण राणा कुठेही दिसला नाही.

बातम्या आणखी आहेत...