आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2021 Phase 2 Will Be Held Between Sep 15 To Oct 15 In UAE, Says Report

सप्टेंबरमध्ये होणार IPL:रिपोर्टमध्ये दावा- UAE मध्ये 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान होतील टुर्नामेंटचे उर्वरित 31 सामने

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • BCCI चे CEO हेमांग अमीनची पहिली पसंती UAE ला

अखेर IPL च्या उर्वरित सामन्यांसाठी BCCI ला विंडो मिळाली आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, आयपीएलचे उर्वरित सामने UAE मध्ये 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान होतील.

टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, UAE मध्ये यापूर्वीही IPL झाले असल्यामुळे बीसीसीआयने पुन्हा या ठिकाणी आयपीएल करण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2021 सीजनला 29 सामन्यानंतर कोरोनामुळे स्थगित करण्यात आले होते. 60 पैकी 31 सामने होणे अजून बाकी आहे. आता उर्वरित सामन्यांबाबत 29 मे रोजी बीसीसीआय घोषणा करू शकते.

इंग्लंड आणि भारतादरम्यान UK मध्ये 4 ऑगस्टपासून कसोटी सामने होणार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमध्ये 9 दिवसांची वेळ आहे. जर ही वेळ कमी केली, तर आयपीएलसाठी अजून वेळ मिळू शकतो. सध्या BCCI यावर चर्चा करत आहे.

BCCI चे CEO हेमांग अमीनची पहिली पसंती UAE ला
BCCI चे अंतरिम CEO हेमांग अमीन 29 मे रोजी होणाऱ्या BCCI च्या स्पेशल बैठकीत IPL चे उर्वरित सामने UAE आणि इंग्लंडमध्ये करण्याबाबत प्रस्ताव मांडतील. त्यांची पहिली पसंती UAE ला असेल.

अमीन या 3 कारणामुळे UAE ला पसंती देत आहेत

  1. कमी खर्च: IPL ला UAE मध्ये करण्याचे एक कारण म्हणजे, इंग्लंडच्या तुलनेत UAE मध्ये IPLसाठी कमी खर्च लागेल. इंग्लंडमध्ये हॉटेल, स्टेडियम इत्यादीचा खर्च UAE च्या तुलनेत जास्त आहे. UAE मध्ये संघ रस्ते मार्गाने स्टेडियमपर्यंत पोहचू शकतात. इंग्लंडमध्ये ट्रॅव्हलिंगचा खर्च वाढेल आणि यामुळे कोरोना होण्याची भीती जास्त आहे.
  2. हवामान: यूकेमध्ये IPL चे सामने न करण्याचे दुसरे कारण म्हणजे, तेखील सप्टेंबरमध्ये असणारे वातावरण. इंग्लंडमध्ये पावसामुळे अनेक सामने रद्द करावे लागतील. पण, UAE मध्ये सप्टेंबर महिन्यात हिवाळा असतो. हे वातावरण खेळाडूंसाठी चांगले आहे.
  3. UAE मध्ये आयोजनाचा अनुभव: IPL चा मागच्या सीजन UAE मध्ये झाला होता. यामुळे, तिथे आयपीएलच्या आयोजनाचा अनुभव आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत आयपीएल झाले नाहीत. त्यामुळे तेथील आव्हाने आता सांगता येत नाहीत.
बातम्या आणखी आहेत...