आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2021 Schedule Updates IPL 14th Season Start From 9 April In Ahmedabad, Bengaluru, Chennai, Delhi, Mumbai & Kolkata Hosting

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL वेळापत्रक जाहीर:9 एप्रिलपासून होणार आपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात, पहिला सामना गतविजेत्या मुंबई आणि बंगळुरूदरम्यान

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदा फायनलसह प्ले-ऑफ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल

बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 14 व्या मोसमाचे वेळापत्रक आज अखेर जाहीर जाले. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली. यंदा आयपीएल भारतात रंगणार असून, सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 52 दिवस रंगेल. या वर्षी पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये होईल.

BCCI ने रविवारी सांगितल्यानुसार, IPL-14 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान होईल. तर, अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. IPL चे सर्व सामने अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकातामध्ये होईल. 8 संघांमध्ये 52 दिवसात 60 सामने होतील. लीग स्टेजचे 56 पैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता, बंगळुरूमध्ये 10-10 आणि दिल्ली आणि अहमदाबादमध्ये 8-8 सामने होतील.

यंदा 11 डबल हेडर असणार

मागच्या सीजनमध्ये कोरोनामुळे मार्च-एप्रिलऐवजी सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये सामने खेळवण्यात आले होते. यावेळेस आयपीएल भारतात होणार आहे. यंदा कोणताच संघ आपल्या आपल्या राज्यात खेळणार नाही. सर्व सामने न्यूट्रल व्हेन्यूवर होतील. तसेच, यंदा 11 डबल हेडर म्हणजेच, एका दिवसात दोन सामने होतील. दुपारचे सामने 3.30 वाजता आणि संध्याकाळचे सामने 7.30 वाजता होतील.

बातम्या आणखी आहेत...