आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल 2022 पूर्वी, बीसीसीआयने बायो-बबल नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सर्व फ्रँचायझींना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता मुंबई इंडियन्सने प्रोटोकॉल राखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. फ्रँचायझीने मुंबईच्या जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये 13,000 स्क्वेअर मीटर परिसरात एमआय एरिना तयार केला आहे. त्यात सर्व सोयी-सुविधा आहेत. इतकंच नाही तर टीम मेंबर्स आणि त्यांच्या कुटुंबियांशिवाय कोणालाही एंट्री मिळणार नाही.
रोहितची पुष्पा स्टाईल
मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'MI एरिना' चा व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये टीमचा कर्णधार रोहित शर्मा 'पुष्पा स्टाईस'मध्ये फिरताना दिसत आहे. यासोबतच तो इतर खेळाडूंसोबत किड्स सेक्शनमध्येही फायरिंग करताना दिसला. जसप्रीत बुमराहही हातात बंदूक घेऊन दिसला. संघातील बाकीचे खेळाडूही एमआय एरिनामध्ये फायरिंग करताना आणि पोलो खेळताना दिसले.
खेळाडूंना एकमेकांशी जोडण्याचा एक चांगला मार्ग
मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे - एमआय एरिना हे खेळाडूंना अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होण्यासाठी आणि सीझनमध्ये एकमेकांना जाणून घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. गेल्या 2 वर्षात लोकांनी अनेक आव्हानांचा सामना केला आहे पण आम्ही एक कुटुंब आहोत आणि प्रत्येकाला सुरक्षित आणि आनंदी ठेवण्याची जबाबदारी MI ची आहे.
फुटबॉल मैदानापासून कॅफेपर्यंत सुविधा
एमआय एरिनामध्ये फुटबॉल ग्राउंड, बॉक्स क्रिकेट, पिकल बॉल कोर्ट, फूट व्हॉलीबॉल, एमआय बॅटल ग्राउंड, किड्स झोन आणि एमआय कॅफे आहे. याशिवाय, टीम हॉटेलमध्ये राहणार आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक जिम, मसाज खुर्च्यासह लाउंज रूम, गेमिंग कन्सोल, आर्केड गेम, इनडोअर बास्केटबॉल शूटर, म्युझिक बँडसाठी स्वतंत्र स्टेज, टेबल टेनिस, कॅफे, पूल टेबल, मुलांचा खेळण्याचा एरिया यांचा समावेश आहे.
पहिला सामना 27 तारखेला
विक्रमी 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. रोहित शर्माशिवाय जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड, इशान किशन आणि सूर्यकुमार यादवसारखे स्टार खेळाडू संघात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.