आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:तब्बल 14 काेटी चाहत्यांची सलामी सामन्याला पसंती

मंुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-२० फाॅरमॅटच्या आयपीएलची लाेकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. याचाच प्रत्यय आयपीएलच्या सलामी सामन्यादरम्यान आला. यंदाच्या १६ व्या सत्रातील आयपीएलचा उद्घाटनीय सलामी सामना गत चॅम्पियन गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात झाला. या सामन्याला जगभरातील १४ काेटी क्रिकेटप्रेमींची पसंती लाभली. यातून आयपीएलच्या व्ह्यूअरशिपचा आकडा वेगाने वाढला आहे. अहमदाबाद येथे एक लाख चाहत्यांनी स्टेडियममध्ये हजेरी लावून हा सलामी सामना पाहिला आहे. त्यामुळे आता यंदाची आयपीएल ही व्युव्हरशिपमध्ये विक्रमाचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.