आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • IPL Auction Players List 2021 News And Updates | IPL 2021 Player Auction LIVE UPDATES; Indian Premier League Auction Latest News, Delhi Capitals Chennai Super Kings Kolkata Knight Riders

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL लिलाव:आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू बनला मॉरिस, राजस्थानने तब्बल 16.25 कोटींमध्ये केले खरेदी; युवराजचा रेकॉर्ड तोडला

चेन्नई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चकीत करणारी 7 नावे, शाहरुख खानला प्रितीच्या संघाने 26 पट जास्त किमतीवर खरेदी केले

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14 व्या सीजनसाठी आज दुपारी 3 वाजेपासून चेन्नईमध्ये लिलाव सुरू झाला आहे. यासाठी 292 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. परंतु, सर्व संघांकडे फक्त 61 खेळाडूंचा स्लॉट रिकामा आहे. दरम्यान, साउथ आफ्रीकेचा ऑलराउंडर क्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटींमध्ये खरेदी केले आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू बनला आहे. यासोबतच त्याने युवराज सिंगचा रेकॉर्ड तोडला आहे. युवीला 2015 सीजनसाठी दिल्लीने 16 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.

चकीत करणारी 7 नावे, शाहरुख खानला प्रितीने 26 पट जास्त किमतीत खरेदी केले

बॉलिंग ऑलराउंडर कृष्णप्पा गौतमची बेस प्राइज 20 लाख रुपये होती. त्याला 46 पट जास्त किमतीवर CSK ने 9.25 कोटी रुपयात खरेदी केले. त्याने IPL इतिहासातील सर्वात महाग अनकॅप्ड प्लेअरचा रेकॉर्ड बनवला आहे. अनकॅप्ड म्हणजे असे खेळाडून, ज्यांनी आतापर्यंत आपल्या देशासाठी एकही आंतरराष्ट्री सामना खेळले नाही. यापूर्वी हा रेकॉर्ड क्रुणाल पांड्याच्या नावे होता. त्याला मुंबईने 8.8 कोटी रुपयात खरेदी केले होते. CSK ला ऑफ-स्पिन ऑलराउंडरची गरज होती. ही गरज गौतम भरुन काढेल.

साउथ आफ्रीकन खेळाडून क्रिस मॉरिसची बेस प्राइज 75 लाख रुपये होती. त्याला 21 जास्त किमतीवर 16.25 कोटी रुपयात राजस्थानने खरेदी केले.

न्यूजीलंडचा ऑलराउंडर काइल जेमिसनला बंगळुरुने 20 पट जास्त किंमत देऊन 15 कोटी रुपयात खरेदी केले.

ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलची बेस प्राइज 2 कोटी रुपये होती. त्याला आरसीबीने 14.25 कोटी रुपयात खरेदी केले.

ऑस्ट्रेलियन बॉलर झाय रिचर्ड्सनला पंजाब किंग्सने 14 कोटी रुपयांना खरेदी केले.

भारतीय युवा ऑलराउंडर शाहरुख खानची बेस प्राइज 20 लाख रुपये होती. प्रिती झिंटाने त्याला 26 पट जास्त पैसे देऊन 5.25 कोटी रुपयांत खरेदी केले.

इंग्लंडचा ऑलराउंडर मोइन अलीला चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने 7 कोटी रुपयात घेतले आहे.

स्टीव स्मिथला दिल्ली कॅपिटल्सने 2.20 कोटींमध्ये खरेदी केले. मागच्या सीजनमध्ये स्मिथला 12.50 कोटी मिळाले होते.

बांग्लादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसनला कोलकाता नाइट रायडर्सने 3.20 कोटींमध्ये खरेदी केले.

खेळाडूंची बेस प्राइज

अनकॅप्ड खेळाडूंसाठी 20, 30 आणि 40 लाखांची बेस प्राइज ठरली आहे. तर, कॅप्ड खेळाडूंना 5 विविध बेस प्राइस 50 लाख, 75 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी आणि 2 कोटीमध्ये ठेवले आहे. कॅप्ड प्लेअर्स ते असतात, जे आपल्या देशासाठी टेस्ट, वनडे, टी-20 पैकी कोणत्याही एका आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळले असतील.

2 कोटी रुपये बेस प्राइज असलेल्या मार्क वुडने नाव परत घेतले

लिलावाच्या काही वेळ आधीच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने आपले नाव परत घेतले आहे. लिलावासाठी त्याच्यावर 2 कोटीची बेस प्राइज ठरली होती. क्रिकेट वेबसाइट ईएसपीएननुसार, वुडने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सध्या, तो भारताविरोधात अखेरचे दोन टेस्ट सामने खेळणार आहे.

एका संघात मॅक्सिमम आणि मिनिमम किती खेळाडू असतील ?

सर्व फ्रेंचायजी आपल्या संघात मॅक्सिमम 25 आणि मिनिमम 18 खेळाडून ठेवू शकतात. तसेच, कोणत्याही संघात जास्तीत-जास्त 8 परदेशी खेळाडून असतील. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे सर्वात कमी 14 आणि सनरायजर्स हैदराबादकडे सर्वाधिक 22 खेळाडून आहेत. म्हणजेच, ऑक्शनमध्ये RCB ला कमीत कमी 4 खेळाडूंची खरेदी करावे लागेल. तर, SRH ज्यास्तीत जास्त 3 खेळाडू खरेदी करू शकतो.

खेळाडू घेण्यासाठी पंजाबकडे सर्वात जास्त पैसे

IPL च्या या सीजनमध्ये फ्रेंचायजीची सॅलरी पर्स (बजेट)मागच्या सीजनप्रमाणे 85 कोटी रुपये आहे. म्हणझेच, कोरोनामुळे यावर्षी सॅलरी बजेटमध्ये कोणतीही वाढल झाली नाही, तर 2019 मध्ये हे बजेट 80 आणि 2018 मध्ये 66 कोटी रुपये होते. यावर्षी पंजाबकडे खेळाडून खरेदी करण्यासाठी सर्वाधिक 53.20कोटी रुपये आहेत.

बातम्या आणखी आहेत...