आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • IPL : Darren Sammy Alleges He And Thisara Perera Faced Racist Abuse While Playing IPL For Sunrisers Hyderabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये वर्णभेद:सनराइजर्स संघात असताना मला आणि थिसारा परेराला ‘काळू’म्हणायचे; वेस्टइंडीजचा माजी कर्णधार डेरेन सॅमीचा आरोप

स्पोर्ट डेस्क9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सॅमीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आयपीएलमध्ये त्याच्यासोबत झालेल्या वर्णभेदाची माहिती दिली आहे

अमेरिकेत कृष्णवर्णय जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर क्रिकेटमधील वर्णभेदाची प्रकरणे समोर येत आहेत. आता हा वर्णभेदाचा ठपका आयपीएलवरही लागला आहे. वेस्टइंडीजचा माजी कर्णधार डेरेन सॅमीने आयपीएलमध्ये वर्णभेद असल्याचा खुलासा केला आहे. सॅमीने आरोप लावला आहे की, जेव्हा तो हैदराबाद फ्रेंचाइजीकडून खेळत होता, तेव्हा त्याला आणि श्रीलंकेच्या थिसारा परेराला रंगावरुन चिडवले जायते.

सॅमीचे म्हणने आहे की, त्याला आणि परेराला ‘काळू’ म्हटले जायये. त्या शब्दाचा अर्थ सॅमीला आता कळाला आहे. हे कळाल्यापासून तो खूप रागात आहे.

पूर्वी मला याचा अर्थ माहित नव्हता: सॅमी

सॅमीने शनिवारी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहीले, ‘‘मला आताच 'काळू' शब्दाचा अर्थ समजला आहे. जेव्हा मी आयपीएलमध्ये सनराइजर्सकडून खेळत होतो, तेव्हा मला आणि थिसारा परेराला याच नावाने हाक मारली जायची. मला तेव्हा वाटले की, याचा अर्थ मजबुत घोडा असेल. पण, आता मला याचा खरा अर्थ समजला आहे.’’ दरम्यान, त्याला काळू नावाने कोण हाक मारत होते, याबाबत त्याने खुलासा केला नाही.

सॅमीचे अमेरिकेतील आंदोलनाला समर्थन

सॅमी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या आंदोलनाचे समर्थन करत आला आहे. त्याने क्रिकेट जगतातून वर्णभेदाविरोधात आवाज उठवण्याची अपील केली आहे.

बातम्या आणखी आहेत...