आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL:आयपीएलला प्रायोजकातून दुप्पट उत्पन्न, यंदा 708 कोटींची कमाई; फ्रँचायझीलाही 25-30% उत्पन्न वाढीची अपेक्षा, 550 कोटींपर्यंत जाऊ शकते

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या आठवड्यात अव्वल-५ कार्यक्रमांत सर्व आयपीएलचे सामने, त्यात तीन मुंबई इंडियन्सचे :

आयपीएल प्रायोजकातून बीसीसीआयला यंदा बक्कळ कमाईची अपेक्षा आहे. गत सत्रात आयपीएलच्या मुख्य प्रायोजकाचे उत्पन्न ५०% कमी झाले होते. मात्र, यंदा दुप्पट झाले आहे. लीगच्या प्रायोजकातून मिळणारे उत्पन्न वाढून ७०८ कोटी रुपये झाले. गत सत्रात केवळ ४०० कोटी रुपये होते. गत सत्रात आयपीएलकडे तीन अधिकृत पार्टनर होते, यंदा वाढून पाच झाले. मुख्य प्रायोजकाची रक्कम ९०-१०० % वाढल्याचा अर्थ फ्रँचायझीची कमाई देखील २५-३०% वाढेल. करारानुसार प्रायोजकातून मिळणाऱ्या कमाईतील भाग फ्रँचायझींना देखील देण्यात येतो. अंदाजित, सर्व ८ फ्रँचायझींचे एकूण उत्पन्न ५५० कोटी रुपयांपेक्षा अधिक होऊ शकते. मोठी फ्रँचायझी ७५-८० कोटी व छोटी फ्रँचायझी ४०-४५ कोटी कमावतील. ब्रॉडकास्टरला ३२०० कोटींच्या कमाईची अपेक्षा आहे.

या आठवड्यात अव्वल-५ कार्यक्रमांत सर्व आयपीएलचे सामने, त्यात तीन मुंबई इंडियन्सचे :
आयपीएलच्या तिसऱ्या आठवड्याची टीव्ही रेटिंग जाहीर झाली. बार्कच्या अहवालानुसार, अव्वल-५ सर्वाधिक पहिल्या गेलेल्या कार्यक्रमात सर्व आयपीएलचे सामने होते. यात तीन मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचा समावेश आहे. १६ ते २३ एप्रिलदरम्यान झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्जचा सामना सर्वाधिक पाहिला गेला. त्याची सरासरी मिनिट प्रेक्षक संख्या २२०४७ राहिली. चेन्नई व केकेआरचा २१ एप्रिल रोजी झालेला सामना दुसऱ्या स्थानी राहिला.

अायपीएलची प्रायाेजकत्वातील कमाई

  • टायटल स्पॉन्सर 440 काेटी
  • ऑफिशियल पार्टनर्स 210 काेटी
  • अंपायर स्पॉन्सर28 काेटी
  • स्ट्रॅटेजिक टाइम अाऊट पार्टनर30 काेटी
बातम्या आणखी आहेत...