आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL From September 18 19 In UAE, There Will Be 10 Double headers In 3 Weeks, With The Final On October 9 Or 10

यूएईत 18-19 सप्टेंबरपासून आयपीएल:3 आठवड्यांमध्ये हाेणार 10 डबल-हेडर, 9 किंवा 10 ऑक्टोबरला अंतिम सामना

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूएईत जून ते अाॅगस्ट या 90 दिवसांत 40 सामने, संथ खेळपट्टीने माेठी धावसंख्या कठीण

यंदाच्या १४ व्या सत्रातील आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना अाता १८ किंवा १९ सप्टेंबर रोजी सुरूवात हाेण्याची शक्यता अाहे. यासाठी बीसीसीअायने खास प्लॅन अाखला. यातून तीन अाठवड्यात १० डबल-हेडर सामने खेळवले जातील. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, किताबाची लढत ९ किंवा १० ऑक्टोबर रोजी होऊ शकतो. लीगच्या उर्वरित ३१ सामन्यांसाठी तीन आठवड्यांचा कालावधी पुरेसा आहे. त्यासाठी लीगचे स्टेक होल्डर्स, बीसीसीआय, फ्रँचायझी व ब्रॉडकास्टर त्यासाठी तयार असतील, अशी अशा आहे. जैवसुरक्षित वातावरणात खेळाडूंना कोरोना झाल्याने लीग ४ मे रोजी स्थगित करावी लागली होती. अधिकाऱ्याने म्हटले की,‘बीसीसीआय सर्व स्टेक होल्डरसोबत चर्चा करत आहे. १८ ला शनिवार व १९ ला रविवार आहे. लीग पुन्हा सुरू करण्यासाठी आठवड्याचा शेवट चांगला पर्याय राहील. ९ व १० ऑक्टोबरलादेखील आठवड्याचा शेवट आहे. दोन पात्रता, १ बाद फेरी व अंतिम सामना मिळून ७ सायंकाळचे सामने होतील. त्याचबरोबर, १० डबल-हेडर सामने होतील.’

सूत्रांनुसार, भारत व इंग्लंड दोन्ही संघांतील खेळाडू १४ सप्टेंबर रोजी अखेरची कसोटी समाप्त झाल्यानंतर सोबतच खासगी विमानाने यूएईला जाऊ शकतात. ते थेट पुन्हा जैवसुरक्षित वातावरणात जाऊ शकतात. वेस्ट इंडीजचे खेळाडूदेखील कॅरेबियन प्रीमियर लीग समाप्त करून यूएईमध्ये दाखल झाल्यावर नियमाप्रमाणे ३ दिवसांच्या क्वाॅरंटाइनमध्ये राहतील. एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने बीसीसीआयच्या या माहितीला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारी टी-२० मालिका रद्द केली आहे. ही मालिका विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने होणार होती. न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेत बदल केला आहे. नोव्हेंबरमध्ये मालिकेचे नवे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

मात्र, आयपीएल यूएईमध्ये कठीण, येथील स्टेडियमवर आधीच सामन्यांचे अायाेजन मार्चमध्ये स्थगित झालेल्या पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) सामने अाता पुढच्या महिन्यात पाच जूनपासून यूएईत होणार आहेत. टी-२० विश्वचषकासाठी देखील यूएई राखीव ठिकाण आहे. पाकिस्तान संघ तेथे न्यूझीलंड व अफगाणिस्तानविरुद्ध मालिका खेळू शकतो. अफगाणिस्तान व आयर्लंडचे सामनेदेखील यूएईत होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, यूएईचे आपले देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सामने होतील. येथे केवळ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, शारजा क्रिकेट स्टेडियम व शेख झाएद क्रिकेट स्टेडियम आहेत. सर्व सामने याच मैदानावर होणार आहेत. सलग एवढे सामने झाल्यास खेळपट्टी चांगली राखणे कठीण जाईल. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यत खेळपट्टी संथ होऊ शकते आणि मोठी धावसंख्या उभारणे शक्य होणार नाही. आयपीएलपूर्वी या मैदानांवर जवळपास ४० सामने खेळवले गेले असतील.

वर्ल्डकपमुळे अायपीएल अायाेजनामध्ये माेठा अडसर!
यूएईमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्याच्या हालचालीअाहेत. भारतात काेराेनाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. याने युएईमध्ये विश्वचषक अायाेजनाला पंसती दिली जात अाहे. यातून बीसीसीअायच्या अायपीएल अायाेजनात अडचणी निर्माण हाेणार अाहे. वर्ल्डकपसाठी बीसीसीअायला १५ दिवसांपूर्वी मैदान आयसीसीला सोपवावे लागेल. विश्वचषक २० ऑक्टोबर रोजी सुरू होणार असेल, तर ५ ऑक्टोबर रोजी सर्व मैदाने आयसीसीला द्यावी लागतील. अशा परिस्थितीत आयपीएल सामन्याचे आयोजन शक्य होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...