आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 'King' Is Back From IPL: Hardik, Who Did Not Get A Place In The Indian Team, Is Now One Of The Strongest Contenders For The Captaincy.

IPL मधून ‘किंग’ इज बॅक::भारतीय संघात स्थान न मिळालेला हार्दिक आता कर्णधारपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक

लेखक: कुमार ऋत्विज10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे म्हणतात की माघार घेण्यापेक्षा चांगले पुनरागमन होणे हे कधी पण चांगले. हार्दिक पांड्याने नेमके तेच करुन दाखवले आहे. 2021 च्या T20 विश्वचषकात अनेकांसाठी खलनायक ठरलेला आज चक्क IPL चा सर्वात मोठा हिरो आहे. एकेकाळी ज्या खेळाडूच्या कारकिर्दीलाच समीक्षकांनी पूर्णविराम दिला होता, त्या खेळाडूने आपल्या मेहनतीने प्रथमच कर्णधारपद भूषवताना संघाला आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून दिले. गुजरात टायंटन्स आज 11 सामन्यांतून 8 सामने जिंकून 16 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.

ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांसारख्या कर्णधारांच्या आयपीएलमध्ये सुरू असलेल्या फ्लॉप शोमध्ये, रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार म्हणून अनेक तज्ञ हार्ड हिटर हार्दिककडे पाहत आहेत. IPL नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिकचे पुनरागमन निश्चित असल्याचे सूत्रांकडून समजते.

T20 वर्ल्ड कपच्या कटू आठवणी

2021 च्या T20 विश्वचषकादरम्यान हार्दिकने पाच सामन्यांमध्ये 34 च्या सरासरीने केवळ 69 धावा केल्या. आपल्याच यजमानपदी आयोजित विश्वचषक स्पर्धेतून टीम इंडिया वाईटरित्या पराभूत झाल्यानंतर बाहेर पडली. भारतामध्ये ज्या खेळाडूंना जनता विजयानंतर डोक्यावर आणि डोळ्यांवर बसवते, तीच जनता या खेळाडूंना पराभवानंतर त्यांच्यावर टीका करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. हार्दिकने आपल्या दुखापतीबाबत योग्य माहिती सार्वजनिक केली नाही आणि पूर्ण तंदुरुस्ती न मिळवता संघात सामील झाल्याचा आरोप करण्यात आला.

सोशल मीडियावर हार्दिकला ट्रोल करणाऱ्या पोस्टचा पूर आला होता. कुटुंबावर वैयक्तिक हल्ल्यांशी संबंधित पोस्ट सर्वत्र येऊ लागल्या. एकेकाळी कपिल देव यांच्याशी ज्या खेळाडूची तुलना केली जात असे, त्याची कारकीर्द शिखरावर पोहोचण्यापूर्वीच संपून जाईल, असे वाटले होते.

हार्दिकचा केवळ फलंदाज म्हणून टी-20 विश्वचषक संघात समावेश

हार्दिकने स्पष्ट केले की, त्याला अष्टपैलू म्हणून नव्हे, तर केवळ एक फलंदाज म्हणून विश्वचषकाचा भाग बनवण्यात आले होते. त्याच्या या स्पष्टीकरणामुळे लोकांचा संताप अनावर झाला. त्याच्या मते हार्दिक फलंदाज म्हणून कोणत्याही संघात खेळण्यास योग्य नव्हता. हार्दिककडे एक साधा हिटर म्हणून पाहिले जात होते जो शेवटी येऊन केवळ उर्वरित चेंडू खेळू शकतो. त्याच्याकडून यापेक्षा चांगला खेळ होईल अशी अपेक्षा कोणालाच नव्हती. मात्र हार्दिकने IPL 2022 मध्ये ही धारणा बदलली आहे.

हार्दिकच्या फिटनेसवर शंका

IPL 15 सुरु होण्याआधीच हार्दिकच्या फिटनेसबाबत शंका होत्या. जोपर्यंत हार्दिकला NCA कडून फिटनेस प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत त्याला ILP मध्ये सहभागी होता येणार नाही, असा आदेश BCCI ने जारी केला होता. गुजरात टायटन्सकडून 15 कोटींमध्ये खेळणाऱ्या हार्दिकची अनुपस्थिती म्हणजे संघातील इतर खेळाडूंचे संतुलन बिघडले असते.

GT ने हार्दीकला 15 कोटींमध्ये घेतल्यानंतर, टीकाकार पुन्हा सक्रिय झाले होते. लंगड्या घोड्यावर सट्टा लावल्यामुळे गुजरात टायटन्स प्रचंड ट्रोल झाली. या स्पर्धेतून बाहेर पडणारा गुजरात हा पहिला संघ असल्याचे बड्या तज्ज्ञांनी तर जाहीरपणे सांगीतले होते. सोशल मीडियावर हार्दिकच्या विरोधात बरेच काही बोलले जात होते.

हार्दिकने युवा खेळाडूंना दिले प्रोत्साहन

आपल्याविरुद्ध निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणात संघातील इतर खेळाडूंचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो, हे हार्दिकच्या लक्षात आले. जेव्हा ते त्यांच्या कर्णधाराबद्दल अशा बातम्या वाचतील आणि ऐकतील तेव्हा त्यांनी कदाचित स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच त्यांचे मनोबल हे ढासळले असते. हे पाहता हार्दिकने संघाच्या जर्सी लाँचप्रंसगी एक मोठे वक्तव्य केले.

हा सामना संघाने जिंकला तर त्याचे सर्व श्रेय युवा खेळाडूंना जाईल, असे हार्दिकने स्पष्ट केले. तर दुसरीकडे, गुजरातला कोणत्याही कारणाने पराभवाला सामोरे जावे लागले, तर अशा स्थितीत कर्णधार म्हणून सर्वस्वी त्याचीच जबाबदारी असेल. या एका विधानाने जणू जादूच केली. IPL सुरू होण्यापूर्वीच जगाने कर्णधार हार्दिकचा नवा पैलू पाहिला होता.

फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच फिल्डिंगमध्येही हार्दिकने केली कमाल.

सुमारे 145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याव्यतिरिक्त, प्रथम फलंदाजी करणे, हार्दिकचे क्षेत्ररक्षण आयपीएल 15 मध्ये खूप चांगले आहे. चेंडू पकडण्यासाठी हवेत उडणे हार्दिकच्या चाहत्यांना खूप आवडते. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पंड्याने थ्रो मारून मधला यष्टी तोडला. त्याने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला थेट थ्रोने धावबाद केले होते. हार्दिकच्या फेकल्याने एलईडी स्टॅंप तुटला होता. हार्दिकचा फिटनेस असाच कायम राहिल्यास आगामी काळात तो टीम इंडियाचा सर्वात मोठा सामना जिंकून देणारा खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...