आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL | Mumbai | Marathi News | Both New Franchises Are Likely To Cost Billions For Northeast; Demand For Foreign Wicketkeepers

आयपीएल 2022 लिलाव:दोन्ही नवीन फ्रँचायझी ईशानसाठी कोट्यवधी खर्च करण्याची शक्यता; परदेशी यष्टिरक्षकाची मागणी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चार संघांचे कर्णधार यष्टिरक्षक आहेत, 6 संघांकडून यष्टिरक्षकांचा शोध

आयपीएल २०२२ मध्ये चार संघांनी यष्टिरक्षकाला आपला कर्णधार बनवले आहे. यात चेन्नई (महेंद्रसिंग धोनी), दिल्ली (ऋषभ पंत), लखनऊ (लोकेश राहुल) आणि राजस्थान (संजू सॅमसन) संघाचा समावेश असून इतर सहा संघ यष्टिरक्षकाचा शोध घेत आहेत. यष्टिरक्षक केवळ तडाखेबंद फलंदाजीच करत नाहीत, तर त्यांच्याकडे यष्टीमागून सामना परीक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे १२-१३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे होणाऱ्या मोठ्या लिलावात फ्रँचायझी यष्टिरक्षकावरही मोठी रक्कम खर्च करू शकतात. ते तरुण आहेत व कुठल्याही संघासोबत दीर्घकाळ राहू शकतील. पाहूयात ५ यष्टिरक्षक, ज्यावर कोट्यवधींची बोली लागू शकते...

या 5 यष्टिरक्षकांना सर्वाधिक मागणी राहण्याची अपेक्षा

1. ईशान (भारत), वय : २३ वर्षे
६१ आयपीएल सामन्यात १३६.३४ च्या सरासरीने १४५२ धावा काढल्या. अहमदाबाद व लखनऊ या दोन्ही नवीन फ्रँचायझींनी लिलावापूर्वी गुणवत्तेमुळे त्याला संघात सहभागी होण्याची ऑफर दिली होती, परंतु त्याने ती नाकारली. हे दोन्ही संघ या खेळाडूसाठी लिलावात मोठी रक्कम खर्च करू शकतात. कारण तो तरुण आहे व दीर्घकाळ संघात कायम राहू शकतो.
उद्याच्या अंकात वाचा अव्वल-५ गोलंदाज, ज्यांच्यावर सर्वाधिक बोली लागू शकते.

2. बेअरस्टो (इंग्लंड), वय: ३२ वर्षे
२८ आयपीएल सामन्यांत १४२.१९ च्या स्ट्राइक रेटने १०३८ धावा काढल्या. कुठल्या क्रमांकावर फलंदाजीची क्षमता असलेला बेयरस्टो एकहाती सामना जिंकून देऊ शकतो. सनरायझर्स हैदराबादकडून खेळलेल्या बेयरस्टोवर अहमदाबाद, पंजाब, मुंबई व केकेआर लिलावात मोठी बोली लावू शकतात. कारण, या तिन्ही संघाला वेगाने धावा करणाऱ्या यष्टिरक्षकाची गरज आहे.

3. डिकॉक (द. अफ्रीका), वय : २९ वर्षे
७७ आयपीएल सामन्यात १३०.९३ च्या स्ट्राइक रेटने २२५६ धावा केल्या. कोणत्याही प्रतिस्पर्ध्यावर सुरुवातीपासूनच हल्ला करण्यात पटाईत आहे. लखनऊला अशाच सलामीवीराची गरज आहे, जो सुरुवातीपासूनच वेगाने सुरुवात करून देऊ शकेल. तो सर्वात महागडा परदेशी यष्टिरक्षक म्हणून विकला गेल्यास आश्चर्य वाटणार नाही, असेही तज्ज्ञांनी म्हटले.

4. पूरन (वेस्ट इंडीज), वय : २६ वर्षे
३३ आयपीएल सामन्यात १५४.९९ च्या स्ट्राइक रेटने ६०६ धावा केल्या. पंजाब किंग्ज किंवा लखनऊ त्याला खरेदीसाठी मोठ्या बोली लावू शकतात. कारण तो आघाडीचा फलंदाज आहे. आघाडीच्या क्रमासाठी दोन्ही संघांना अशा खेळाडूची गरज आहे. तो पॉवर हीटर तर आहेच, पण गरजेनुसार खेळात बदलही करू शकतो.
5. दिनेश कार्तिक (भारत), वय : ३६ वर्षे

२१३ आयपीएल सामन्यात १२९.७२ च्या स्ट्राइक रेटने ४०४६ धाव, ज्यात १९ अर्धशतकांचा समावेश. त्याच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी अहमदाबाद व पंजाब आघाडीवर आहेत. गेल्या काही मोसमात तो यशस्वी फिनिशरही ठरला. कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यात महारथी असलेला कार्तिक दबावाची परिस्थिती हाताळण्यात पटाईत आहे. त्याला लिलावाच्या टेबलवर प्राधान्य देत टीम मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकतात.

विविध ६ संघांकडून खेळला आहे.
तरुण असल्याने फ्रँचायझी भविष्यात कर्णधारपदाचा पर्याय म्हणून पाहते.
एक शतक आणि सात अर्धशतके ठाेकली आहेत.
एक शतक आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत.
२०२० सत्रामध्ये मुंबईकडून सर्वाधिक ३० षटकार खेचले होते.

बातम्या आणखी आहेत...