आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर निकाेलस पुरनने (१९ चेंडूंत ६२ धावा) झंझावाती खेळीतून पाहुण्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला साेमवारी यंदाच्या सत्रातील आयपीएलमध्ये राेमहर्षक विजय मिळवून दिला. लाेेकेश राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ संघाने लीगच्या आपल्या चाैथ्या सामन्यात फाफ डुप्लेसिसच्या यजमान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव केला. लखनऊ संघाने एका गड्याने विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना यजमान बंगळुरू संघाने दाेन गड्यांच्या माेबदल्यात पाहुण्या लखनऊ संघासमाेर विजयासाठी २१३ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरामध्ये लखनऊ संघाने ९ गडी गमावत विजयश्री खेचून आणली. यासह लखनऊ संघाला लीगमध्ये आपल्या नावे चार सामन्यांत तिसऱ्या विजयाची नाेंद करता आली. यादरम्यान बंगळुरू संघाला लीगमध्ये तीन सामन्यांत दुसऱ्या पराभवाला सामाेेरे जावे लागले. यादरम्यान फाॅर्मात आलेला माजी कर्णधार विराट काेहली (६१), कर्णधार फाफ डुप्लेसिस (नाबाद ७९) आणि ग्लेन मॅक्सवेलने (५९) केलेली तुफानी खेळी व्यर्थ ठरली. या खेळीच्या बळावर बंगळुरू संघाने आपल्या नावे यंदाच्या सत्रातील आयपीएलमध्ये दुसऱ्या माेठ्या स्काेअरची नाेंद केली हाेती. लखनऊने गाठले सत्रात माेठे लक्ष्य : लखनऊ संघाने सामन्यात माेठे लक्ष्य गाठून दणदणीत विजयाची नाेंद केली. यापूर्वी संघाला २००+ धावांचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागला हाेता. बंगळुरू संघाने साेमवारी घरच्या मैदानावर लाेकेश राहुलच्या लखनऊ सुपरजायंट्स टीमविरुद्ध २ गड्यांच्या माेबदल्यात २१२ धावा काढल्या. यासह लखनऊ संघाविरुद्ध आणि यंदाच्या लीगमधील हा दुसरा माेठा स्काेअर ठरला. यापूर्वी ३ एप्रिल राेजी यजमान चेन्नई संघाने घरच्या मैदानावर लखनऊ टीमविरुद्ध ७ बाद २१७ धावा काढल्या हाेत्या.
मॅक्सवेलचे पहिले अर्धशतक : बंगळुरू संघाकडून ग्लेन मॅक्सवेलला ितसऱ्या सामन्यातून यंदा अर्धशतकाचे खाते उघडता आले. तिसऱ्या स्थानावरून फलंदाजी करताना त्याने आपल्या घरच्या मैदानावर २४ चेंडूंत अर्धशतकी खेळी केली. यादरम्यान त्याने २९ चेंडूंत ३ चाैकार व ६ षटकरासह ५९ धावा काढल्या आहेत.
निकाेलसचे सत्रात वेगवान अर्धशतक; १५ चेंडूंत ३ चाैकार, ६ उत्तंग षटकार
पाहुण्या लखनऊ सुपरजायंट्स संघाच्या विजयात माेलाचे याेगदान देणाऱ्या निकाेलस पुरनची खेळी लक्षवेधी ठरली. त्याने तुफानी फलंदाजी करताना यंदाच्या सत्रात वेगवान अर्धशतकाची नाेंद केली. त्याने १५ चेंडूंमध्ये ३ चाैकार आणि ६ उत्तंुग षटकारातून अर्धशतक साजरे केले. यासह त्याने चेन्नईच्या अजिंक्य रहाणेच्या १९ चेंडूंत वेगवान अर्धशतकाचा विक्रम ब्रेक केला. आता निकाेलसने १९ चेंडूंचा सामना करताना ४ चाैकार व ७ षटकारांतून ६१ धावांची खेळी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.