आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • IPL Not Canceled Yet, Postponed Till May 3; Thinking Under Consideration To Prevent Loss Of 3,000 Crores

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टी-20:आयपीएल अद्याप रद्द  नाही, 3 मेपर्यंत स्थगित; 3 हजार काेटींचे नुकसान टाळण्यासाठी आयाेजन विचाराधीन

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लाॅकडाऊन वाढल्यामुळे बीसीसीआयचा निर्णय; प्रेक्षकांविना स्पर्धा आयाेजनासाठी मंडळ प्रयत्नशील
  • काेराेना : टी-२० विश्वचषक आयाेजनावर टांगती तलवार

काेराेनाचा धाेका अद्यापही कायम आहे. त्यामुळे हीच गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सध्या देशभरात आता लाॅकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली. यातूनच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही आपल्या आयपीएल स्पर्धेच्या बाबतीत माेठा निर्णय घ्यावा लागला. सध्याची परिस्थिती अधिकच गंभीर असल्याने बीसीसीआयने आयपीएलला ३ मेपर्यंत स्थगिती देण्याची घाेषणा मंगळवारी केली. मात्र, अद्याप या स्पर्धेच्या रद्दबाबत काेणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. कारण या स्पर्धेच्या रद्दमुळे बीसीसीआयला माेठी आर्थिक झळ बसणार आहे. यंदा ही लीग झाली नाही तर बीसीसीआयला ३६०० काेटींचा फटका बसणार आहे. स्पर्धेच्या मीडिया राइट्सच्या माध्यमातून बीसीसीआयला ही कमाई करता येईल. त्यामुळेच आता बीसीसीआय प्रेक्षकांविना नाेव्हेंबरमध्ये आयपीएलच्या आयाेजनाबाबत प्रयत्नशील आहे.  गत महिन्यात बीसीसीआयने १४  एप्रिलपर्यंत स्पर्धेच्या स्थगितीचा निर्णय घेतला हाेता. आता यामध्ये नव्याने वाढ करण्याची घाेषणा आज करण्यात आली. यासाठी चर्चात्मक बैठकीचे आयाेजन केले हाेते.

तिकीट विक्री बंद; फ्रँचायझींनाही बसणार माेठा फटका 

आयपीएल रद्दचा माेठा फटका फ्रँचायझींनाही बसणार आहे. कारण या सर्वांना तिकिटाच्या माध्यमातून माेठी कमाई करता येते. आता प्रेक्षकांविना हाेणाऱ्या आयपीएलमुळे फ्रँचायझींना कमाई करता येणार नाही. त्यामुळेच आता फ्रँचायझी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.  अाॅक्टाेबर-नाेव्हेंबरमध्ये आयपीएल आयाेजनाचा बीसीसीआयचा विचार आहे. यासाठी माेजक्याच तीन शहरांतील स्टेडियमवर या सामन्यांचे आयाेजन केले जाईल. 

सामन्यागणिक ६० काेटी; एकूण ३६०० काेटींचे नुकसान

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आयपीएलच्या प्रत्येक सामन्यातून माेठी कमाई करता येते. यातील प्रत्येक सामना हा बीसीसीआयच्या तिजाेरीत तब्बल ६० काेटींची भर घातलाे. यातूनच ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला जवळपास ३६०० काेटींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. कारण मंडळाने २०१८ ते २०२३ पर्यंत पाच वर्षांसाठी प्रक्षेपण हक्कातून १६ हजार ३४८ काेटींचा करार केलेला आहे. हेच नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे.

बातम्या आणखी आहेत...