आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • IPL Not Yet Discussed With Sri Lanka: BCCI; T20 League Postponed Indefinitely

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:आयपीएलबाबत अद्याप श्रीलंकेशी चर्चा झाली नाही : बीसीसीआय; टी-20 लीग अनिश्चित काळासाठी स्थगित

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मुलगी समायरासाेबत राेहित व रितिका शर्मा. - Divya Marathi
मुलगी समायरासाेबत राेहित व रितिका शर्मा.
  • श्रीलंकेने दिला आयोजनाचा प्रस्ताव

काेरोना व्हायरसमुळे आयपीएलला अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. यादरम्यान गुरुवारी श्रीलंका मंडळाने टी-२० लीगचे आयोजन आपल्या देशात करावे, असे म्हटले हाेते. मात्र, बीसीसीआयने स्पष्ट केले की, स्पर्धेच्या आयोजनाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. २९ मार्चपासून लीग सुरू होणार होती. लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. 

श्रीलंका मंडळाचे अध्यक्ष शम्मी सिल्वाने म्हटले की, आमच्या देशात व्हायरसचे प्रकरण कमी आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, जेव्हा संपूर्ण जगच ठप्प झाले आहे तेव्हा आम्ही काही करण्याच्या स्थितीत नाही. श्रीलंकेकडून कोणताच अधिकृत प्रस्ताव आला नाही. त्यामुळे चर्चा  झाली नाही. 

बातम्या आणखी आहेत...