आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • IPL Postponed; Sri Lanka's League Proposal Prepared; The League Is Lock Up To The Next Big Decision

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टी-20:आयपीएल स्थगित; श्रीलंकेचा लीग अायाेजनाचा प्रस्ताव तयार; पुढच्या माेठ्या निर्णयापर्यंत लीग झाली लाॅक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • डिसेंबरपर्यंत लीगचे अायाेजन अवघड; नव्या वर्षांतच स्पर्धेची शक्यता

कोरोना व्हायरसचा धाेेका वेगाने वाढत अाहे. याच गंभीर परिस्थितीचा धाेका लक्षात घेऊन अाता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यंदाची १३ व्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेला (अायपीएल) अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली. बीसीसीअायने गुरुवारी याची अधिकृत अशी घाेषणा केली. दाेन दिवसांपूर्वीच या स्पर्धेला येत्या ३ मेपर्यंत स्थगित करण्याचे जाहीर करण्यात अाले हाेते. त्यामुळे अाता यंदाची १३ व्या सत्रातील अायपीएल सध्या तरी हाेणार नसल्याचे चित्र अाहे. यंदा या लीगला २९ मार्चपासून सुरुवात हाेणार हाेती. मात्र, लाॅकडाऊनमुळे या लीगला सुरुवातीला १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात अाले. त्यानंतरही काेराेनाची भीती कायमच अाहे. हीच गंभीर परिस्थिती लक्षात घेत बीसीसीअायने तत्काळ या लीगला दुुसऱ्यांदा ३ मेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, बुधवारी या लीगला अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. मात्र, याला अधिकृत असा दुजाेरा मिळत नव्हता. अखेर गुरुवारी बीसीसीअायने हा निर्णय जाहीर केला. तसेच फ्रँचायझींनी या निर्णयाला दुजाेरा दिला. 

अाराेग्य महत्त्वाचे : शहा

देश अाणि खेळाडूंच्या अाराेग्याचा मुद्दा हा फारच महत्त्वाचा अाहे. काेराेनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. यासाठी खेळाडूंच्या अाराेग्याची काळजी घेत अायपीएल स्थगितीचा निर्णय घेतला अाहे. याने भविष्यातील धाेका टाळता येईल, अशी प्रतिक्रिया सचिव जय शहा यांनी दिली. 

अायपीएलने श्रीलंका मंडळाच्या अार्थिक परिस्थितीत सुधारणा

अार्थिक अडचणीत असलेल्या श्रीलंका क्रिकेट मंडळाने अाता अायपीएल स्पर्धा अायाेजन करण्याची तयारी दाखवली अाहे. या स्पर्धेच्या अायाेजनातून  मंडळाची डबघाईस अालेल्या अार्थिक परिस्थिती सुधारू शकताे. त्यामुळेच अाम्ही या लीगचे यजमानपदासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया श्रीलंका मंडळाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी दिली. लाॅकडाऊनमुळे  भारतामध्ये अायाेजित करणे, अशक्य अाहे. हाच विचार करून श्रीलंका मंडळाने प्रस्ताव पाठवला.

बातम्या आणखी आहेत...