आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL Star Play; Rajat Patidar's 7 Runs, Prithvi Shaw's Dismissal At Zero, Mumbai's 260 For 5

रणजी ट्रॉफी उपांत्य फेरी:आयपीएल स्टार प्‍लॉप; रजत पाटीदारच्या 7 धावा, पृथ्वी शॉ शून्यावर बाद,  मुंबईच्या 5 बाद 260 धावा

अल्लूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतीच झालेली आयपीएल गाजवणारे सुपरस्टार युवा खेळाडू देशातील प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत प्‍लॉप ठरले. दिल्लीकडून धावांचा पाऊस पाडणारा पृथ्वी शाॅ हा मुंबई संघात सपशेल अपयशी ठरला. ताे मंगळवारी उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्याच दिवशी पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. तसेच बंगळुरू संघाकडून शतकी खेळी करणारा रजत पाटीदार हा मध्य प्रदेश संघाच्या लढतीत अपयशी ठरला. त्याला बंगालविरुद्ध सामन्यात फक्त ७ धावांची खेळी करता आली.

दरम्यान, ४१ वेळच्या चॅम्पियन मुंबई संघाच्या यशस्वी जायस्वालची (१००) शतकी खेळी लक्षवेधी ठरली. त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दुसरे शतक साजरे केले. याशिवाय युवा फलंदाज हार्दिक तमाेरने (५०) नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ५ गड्यांच्या माेबदल्यात २६० धावा काढल्या. गत सामन्यातील द्विशतकवीर सुवेद पारकर ३२ आणि शतकवीर सरफराज खान ४० धावांवर बाद झाला. उत्तर प्रदेश संघाकडून यश दयाल आणि करण शर्माने प्रत्येकी दाेन गडी बाद केले. तसेच शिवम मवीने एक विकेट घेतली.

हिमांशूचे पहिले शतक :
मध्य प्रदेश संघाच्या हिमांशू मंत्रीने (१३४) दाेन वेळच्या चॅम्पियन बंगाल संघाविरुद्ध शानदार नाबाद शतकी खेळी केली. त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक साजरे केले. तसेच अक्षत रघुवंशीने (६३) अर्धशतक साजरे केले. त्यामुळे मध्य प्रदेश संघाला दिवसअखेर पहिल्या डावात ६ बाद २७१ धावा काढता आल्या. बंगालकडून मुकेश कुमार आणि आकाशदीपने प्रत्येकी दाेन बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...