आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL Tournament To Be Held In October Nehra; Time To Recover From Injury : Chahar

आयपीएल:ऑक्टोबरमध्ये होऊ शकते आयपीएल स्पर्धा - नेहरा; दुखापतीतून सावरण्यास वेळ मिळाला : चाहर

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ऑगस्टमध्ये पावसामुळे आयोजन शक्य नाही

आयपीएलचे आयोजन ऑक्टोबरमध्ये केले जाऊ शकते, असे भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने म्हटले. कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. नेहराने म्हटले, ‘आयपीएल ऑगस्टमध्ये होऊ शकत नाही. कारण तो पावसाचा काळ असतो. जर ऑक्टोबरमध्ये जगभरातील काेरोना व्हायरसची परिस्थिती नियंत्रणात आली, तर आयपीएल होईल, असा विश्वास वाटतो.’ 

दुखापतीतून सावरण्यास वेळ मिळाला : चाहर

चेन्नई : भारताचा वेगवान गाेलंदाज दीपक चाहरसाठी आयपीएल स्थगित झाल्याने फायदा झाला. स्पर्धेला उशीर होत असल्याने त्याला पाठीच्या दुखण्यातून सावरण्यासाठी वेळ मिळला. चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणाऱ्या चाहरने म्हटले की, ‘मी पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी आतुर आहे. आता मी तंदुरुस्त राहू इच्छितो.’ २७ वर्षीय चाहर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध वनडे मालिकेदरम्यान जखमी झाला त्यामुळे ताे मार्चपर्यंत मैदानाबाहेर झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...