आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • IPL Tournament Will Be In The UAE Instead Of India; Chairman Brijesh Patel Said We Have Sought Permission From The Government, Preparations Will Start Soon

अखेर IPL-2020 वर निर्णय झाला:भारताऐवजी यूएईमध्ये होईल टूर्नामेंट; चेअरमन बृजेश पटेल म्हणाले- आम्ही सरकारकडे परवानगी मागतली आहे, लवकरच तयारी सुरू होईल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएल चेअरमन पटेल म्हणाले- टूर्नामेंट शेड्यूल लहान होणार नाही, लीगमध्ये 60 सामने होतील

कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलेल्या इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)वर अखेर निर्णय झाला आहे. गव्हर्निंग काउंसिलचे चेअरमन बृजेश पटेल यांनी मंगळवारी सांगितले की, भारताऐवजी यूएईमध्ये आयपीएल टुर्नामेंट होईल, यासाठी आम्ही सरकारकडे परवानगी मागितली आहे. पुढील काही दिवसात आयपीएल गव्हर्निंग काउंसिलची मीटिंग होईल, यात फायनल शेड्यूल ठरवला जाईल.

पटेल पुढे म्हणाले की, टूर्नामेंट लहान होणार नाही. लीगमध्ये 60 सामने होतील. सोमवारी आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप रद्द केल्यानंतर आयपीएलवर निर्णय घेण्यात आला. पटेल यांना टुर्नामेंट आयोजित करण्यात कोणत्या अडचणी येऊ शकतात, याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, टुर्नामेंट भारतात झाला किंवा दुसऱ्या देशात, ऑपरेशन पार्ट कठीण आहे. 

सप्टेंबर-नोव्हेंबंरमध्ये होऊ शकतो टुर्नामेंट

वर्ल्ड कप रद्द झाल्यानंतर बीसीसीआय यावर्षी 26 सप्टेंबर- 7 नोव्हेंबरपर्यंत आयपीएल करण्यावर विचार करत आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, बीसीसीआयने आयपीएल फायनलसाठी 7 नोव्हेंबर साठी ठरवला आहे, म्हणजे भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी वेळ मिळेल. भारतीय संघाला डिसेंबरमध्ये 4 सामन्यांची टेस्ट सीरीजसाठी तिथे जायचे आहे.