आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL; TV To Star For Rs 44,000 Crore, Digital Rights To Reliance, 2 Packages Sold, 2 Balances ... Still Bid Today

ई-लिलाव:आयपीएल; 44 हजार कोटींत स्टारकडे टीव्ही तर रिलायन्सकडे डिजिटल हक्क, 2 पॅकेज विकले,2 शिल्लक... आजही बोली

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल मीडिया हक्काचा ई-लिलाव दुसऱ्या दिवशीही पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे मंगळवारीही तो सुरू राहील. २०२३-२७ पर्यंत ४१० सामन्यांसाठी टीव्ही आणि डिजिटल हक्क ४४,०७५ कोटी रुपयांत विकले. सूत्रांनुसार, स्टार इंडियाने टीव्ही हक्क २३,५७५ कोटी व रिलायन्सने डिजिटल हक्क २०,५०० कोटींत खरेदी केले. बीसीसीआयने अधिकृत घोषणा केली नाही.आता ओपनिंग, फायनल, प्लेऑफ सामन्यांसाठी स्पर्धा आहे.

पुढील वर्षी पैशांचा पाऊस; खेळाडूंचे वेतन आणि बक्षीस रक्कमही वाढणार
-वृत्तानुसार, आयपीएल २०२३ साठी फ्रँचायझी सॅलरी पर्स १८० कोटी रु. केली जाऊ शकते. सध्या ही ९० कोटीच आहे.
-खेळाडूंच्या वेतनातही चांगली वाढ होईल. जास्तीत जास्त बोली २५ कोटींपर्यंत जाऊ शकते.
- खेळाडूंचे वार्षिक पॅकेजही वाढू शकते. ए+ ग्रेड खेळाडूंसाठी हे ७ कोटी रु. आहे.
-बीसीसीआय ९०० खेळाडू व माजी पंचांचे पेन्शन ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत वाढवेल.

बातम्या आणखी आहेत...