आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • IPL2020; Mumbai Indians Fast Bowler Lasith Malinga, The Highest Wicket Taker In The IPL, Has Pulled Out Of The 2020 Season In The UAE Owing To Personal Reasons

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई इंडियंसला मोठा धक्का:लसित मलिंगाची आयपीएलमधून माघार, एकही सामना न खेळलेल्या जेम्स पॅटिंसनला संधी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मलिंगाने कौटुंबिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेत असल्याचे म्हटले आहे

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियंसची अडचण वाढली आहे. संघातील फास्ट बॉलर आणि आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या लसित मलिगांने आयपीएलमधून माघार घेतली आहे. मलिंगाने कौटुंबिक कारणास्तव टुर्नामेंट सोडत असल्याचे सांगितले. आता मलिंगाच्या जागी ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेम्स पॅटिंसनला संधी मिळाली आहे.

मुंबई इंडियंसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले की, संघाने यावर्षी आयपीएलसाठी लसित मलिंगाऐवजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेम्स पॅटिंसनला साइन केले आहे. मलिंगाने खासगी कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे.

आम्ही मलिंगाला मिस करतोल: आकाश अंबानी

संघाचे मालक आकाश अंबानीने म्हटले की, जेम्स आमच्यासाठी योग्य पर्याय आहे, त्यांच्या येण्याने आमच्या संघाची गोलंदाजी मजबूत होईल. मलिंगा लीजेंड आहेत आणि मुंबई इंडियंससाठी एक मजबूत पिलर होते. आम्ही त्यांना मिस करतोल.

मलिंगाचा आयपीएल रेकॉर्ड

मलिंगाने आयपीएलच्या 122 सामन्यात 170 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एका सीजनमध्ये सर्वाधिक 28 विकेट्स 2011 मध्ये घेतल्या होत्या. तसेच, आयपीएलमध्ये सर्वात जास्त डॉट बॉल फेकणारा दुसरा गोलंदाज आहे. मलिंगाने आतापर्यंत 1155 डॉट बॉल टाकल्या आहेत, तर हरभजन सिंगने सर्वाधिक 1249 डॉट बॉल फेकल्या आहेत.