आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणी चषक:शेष भारतची आघाडी

ग्वाल्हेर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेलंदाज पुलकित नारंग (४/६५) आणि यशस्वी जैस्वालच्या (नाबाद ५८) शानदार खेळीतून शेेष भारत संघाने शुक्रवारी इराणी चषक स्पर्धेत विजयी सलामीचे संकेत दिले. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली शेष भारताने सलामी सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध एकूण २७५ धावांची आघाडी घेतली. मध्य प्रदेश संघाला घरच्या मैदानावर आपला पहिला डाव अवघ्या २९४ धावांवर गुंडाळावा लागला. यातून पहिल्या डावात ४८४ धावांचा डाेंगर रचणाऱ्या शेष भारताला १९० धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर शेष भारताने शुक्रवारी तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात १ बाद ८५ धावा काढल्या. यातून संघाकडे आता एकूण २७५ धावांची आघाडी झाली आहे. संघाचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन (२६) आणि यशस्वी (५८) मैदानावर कायम आहेत.

बातम्या आणखी आहेत...