आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेष भारत व २०२१-२२ चा रणजी चॅम्पियन मध्य प्रदेश संघादरम्यान बुधवारी इराणी करंडकला सुरुवात झाली. मयंक अग्रवालच्या नेतृत्वात शेष भारताने पहिल्या दिवशी यजमान संघावर वर्चस्व राखले. शेष भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसअखेर संघाने ३ बाद ३८१ धावा काढल्या. सलामीवीर मयंक (२) स्वस्तात परतला. त्यानंतर अभिमन्यू ईश्वरन व यशस्वी जैस्वाल जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ३७१ धावांची भागीदारी केली. आवेश खानने यशस्वीचा त्रिफळा उडवत भागीदारी तोडली. त्यानंतर ईश्वरनही बाद झाला. बाद होण्यापूर्वी यशस्वीने ३० चौकार व ३ षटकारांच्या मदतीने २१३ धावांची खेळी केली. ईश्वरनने (१५४) शानदार शतक झळकावले. दिवसअखेर सौरभकुमार (०*) आणि बाबा इंद्रजित नाबाद ३ धावांवर खेळत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.