आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Iran's Union Decision, Support For Hijab Protests; The Team Did Not Sing The National Anthem

फिफा वर्ल्डकप:इराणच्या संघाचा निर्णय, हिजाब विरोधाला पाठिंबा; संघाने गायले नाही राष्ट्रगीत

दोहा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलकांना मोठे समर्थन मिळाले आहे. कतारमध्ये सोमवारी फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याच्या प्रारंभी इराणी फुटबॉल खेळाडूंनी राष्ट्रगीत गायन केले नाही. सर्व खेळाडू एकमेकांच्या खांद्यांवर हात ठेवून उभे होते. खेळाडूंचे चेहरे भावनाशून्य दिसत होते. अनेक खेळाडूंनी आपले डोके झुकवले होते. संघाचा कर्णधार अलीरेजा जहानबख्श याने सांगितले की, राष्ट्रगीत गायन न करण्याचा निर्णय सामूहिक होता. जेव्हा स्टेडियममध्ये इराणच्या राष्ट्रगीताची धून वाजत होती, तेव्हा तेथे उपस्थित इराणी प्रेक्षकांनी हुकूमशाही सरकारच्या विरोधात हू-हू असा आवाजही काढला.

बातम्या आणखी आहेत...