आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Ireland's Gaelandaz Little's Participation In IPL Is Noteworthy; Irish Fans Also Support Defending Champions Gujarat

दिव्य मराठी विशेष:आयर्लंडचा गाेलंदाज लिटिलचा आयपीएलमधील सहभाग लक्षवेधी; आयरिश चाहत्यांचेही गत चॅम्प गुजरातला पाठबळ

अहमदाबाद/ डब्लिन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २३ वर्षीय जाेश लिटिल यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात संघासाेबत करारबद्ध; लीगमध्ये सरस खेळी

हार्दिकच्या नेतृृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने गत सत्रामध्ये पदार्पणात चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. यासह गुजरात संघाला जगातिक स्तरावर आपला ठसा उमटवता आला. हार्दिकच्या झंझावाती खेळी आणि कुशल नेतृत्वाचे माेठ्या संख्येत चाहते झाले. यामुळे गुजरात संघाचे जगाच्या कानाकाेपऱ्यात चाहते असल्याचे दिसून आले. आता सध्या गुजरात टायटन्स संघाला आयरिशच्या चाहत्यांचेही खास पाठबळ लाभत आहे. कारण,

आयर्लंडचा २३ वर्षीय गाेलंदाज जाेश लिटिल हा यंदाच्या १६ व्या सत्रातील आयपीएलमध्ये गत चॅम्पियन गुजरात संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने गत शुक्रवारी उद्घाटनीय सामन्यादरम्यान चार वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरुद्ध एक विकेट घेतली. त्याची हीच खेळी लक्षवेधी ठरली. यासह या संघाला आयर्लंडच्या काेट्यावधी चाहत्यांचे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे गुजरात संघाच्या सलामीच्या विजयाचा जल्लाेष आयर्लंडमध्येही करण्यात आला. लिटिल हा आयपीएलमध्ये खेळत असलेला पहिला अॅक्टिव्ह आयरिश क्रिकेटपटू आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये क्रिकेटपटू इयान माॅर्गनने पदार्पण केले हाेते. त्याचे हे १३ वर्षांपूर्वीचे पदार्पण लक्षवेधी ठरले. मात्र, ताे यादरम्यान इंग्लंड संघाकडून खेळत हाेता. त्यामुळे आता त्याच्यापेक्षा लिटिलचा सहभाग अधिक चर्चेत आहे.