आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांगलादेशाविरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकून चर्चेत आलेला भारतीय क्रिकेटर ईशान किशन रणजी ट्रॉफीमध्ये धर्मसंकटात अडकला आहे. त्याचे झाले असे की, एका चाहत्याने त्याला आपल्या मोबाइल कव्हरवर ऑटोग्राफ मागितला. त्या कव्हरवर अगोदरच महेंद्र सिंह धोनीची स्वाक्षरी होती.
ईशानच्या सिग्नेचरसाठी खाली जागा नव्हती. हो, पण थोडी जागा धोनीच्या ऑटोग्राफच्या वर अवश्य होती. त्यामुळे किशनला धोनीच्या ऑटोग्राफच्या वर स्वाक्षरी कशी करावी? असा प्रश्न पडला. त्याने ऑटोग्राफ देण्यास नकार दिला. पण, चाहत्याने हट्ट धरल्यामुळे किशनने त्याला ऑटोग्राफ दिला, पण धोनीच्या ऑटोग्राफ खाली.
प्रथम पाहा या घटनेचा व्हिडिओ, त्यानंतर जाणून घेऊया ही घटना कुठे घडली
केरळ-झारखंड सामन्यातील प्रसंग
ही घटना रांचीत झारखंड-केरळमध्ये खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात घडली. या सामन्यात झारखंडचा पहिल्या डावात ईशान किशनने (132) शतक ठोकले. त्यानंतर एका चाहत्याने त्याच्याजवळ येवून आपल्या मोबाइल कव्हरवर ऑटोग्राफ देण्याची विनंती केली.
ईशानने स्वाक्षरी देण्यासाठी मोबाइल उलटला तर त्याला कव्हरवर अगोदरच एम एस धोनीची स्वाक्षरी असल्याचे दिसली. त्याच्या साइनसाठी त्या ठिकाणी जागाच नव्हती. हे पाहून ईशान म्हणाला - मी दुसऱ्या एखाद्या वस्तूवर स्वाक्षरी देतो. त्यावर चाहत्याने धोनीच्या स्वाक्षरीच्या वर स्वाक्षरी करण्याची सूचना केली. त्यानंतर ईशान किशन म्हणाला - 'माही भाईच्या सिग्नेचरच्यावर स्वाक्षरी करायला मी अजून एवढा मोठा झालो नाही.'
सोशल मीड्यावर व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओत ईशान काय म्हणाला हे त्याच्याच शब्दात वाचा - 'माही भाई का सिग्नेचर है और उसके ऊपर मुझे कह रहे हैं करने को मुझसे यह हो नहीं रहा है। माही भाई के सिग्नेचर के साथ में मैं क्या करूंगा। माही भाई के सिग्नेचर के ऊपर मैं कहां से घुस जाऊं, अभी हम लोग उनके बराबरी तक पहुंचे नहीं हैं। मैं नीचे कर देता हूं, ठीक है।'
या व्हिडिओवरून भारतीय संघातील खेळाडू महेंद्र सिंह धोनीला किती मान देतात हे दिसून येते.
बांगलादेशाविरोधात ठोकले होते द्विशतक
ईशान किशनने बांगलादेशाविरोधातील वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात द्विशतक ठोकले होते. त्याने 10 डिसेंबर रोजी झालेल्या या सामन्यात अवघ्या 131 चेंडूंवर 210 धावा कुटल्या होत्या. टीम इंडियाने हा सामना 227 धावांनी जिंकला होता.
आता ईशान किशनने द्विशतक ठोकलेल्या सामन्याचे काही फोटो पाहा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.