आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Ishika's 3 Wickets, Harmanpreet's Second Half century; Mumbai Indians Win

महिला लीग ::इशिकाचे 3 बळी, हरमनप्रीतचे दुसरे अर्धशतक; मुंबई इंडियन्सचा विजयी चाैकार

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूपी वाॅरियर्जवर १७.३ षटकांत ८ गड्यांनी मात

फाॅर्मात असलेल्या युवा गाेलंदाज साइका इशिका (३/३३) आणि कर्णधार हरमनप्रीत काैरने (नाबाद ५३) मुंबई इंडियन्स संघाचा रविवारी महिला प्रीमियर लीगमध्ये सलग चाैथा विजय साजरा केला. मुंबई संघाने स्पर्धेतील आपल्या चाैथ्या सामन्यामध्ये हिलीच्या यूपी वाॅरियर्ज संघावर मात केली. मुंबईने १७.३ षटकांत ८ गड्यांनी सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना यूपी वाॅरियर्ज संघाने ६ बाद १५९ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरामध्ये मुंबई संघाने २ गड्यांच्या माेबदल्यात १५ चेंडू राखून विजयश्री खेचून आणली. कर्णधार हरमनप्रीतने आपली लय कायम ठेवताना पहिल्या लीगमध्ये आपल्या नावे दुसऱ्या अर्धशतकाची नाेंद केली आहे.

बंगळुरू संघावर सलग पाचव्या पराभवाचे सावट; आज दिल्लीविरुद्ध सामना
सलगच्या चार पराभवाने अडचणीत सापडलेला राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची महिला प्रीमियर लीगमधील वाट अधिकच खडतर झाली आहे. स्मृतीच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या या संघाला आता दिल्ली कॅपिटल्सच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. हे दाेन्ही संघ साेमवारी समाेेरासमाेर असतील. बंगळुरू संघाला सलग चार सामन्यांमध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामाेेरे जावे लागले आहे. सर्वात महागडी फलंदाज आणि कर्णधार स्मृती अद्यापही माेठी खेळी करू शकली नाही. रिचा घाेषही अद्याप आपली छाप पाडू शकला नाही. संघावर आता सलग पाचव्या पराभवाचे सावट निर्माण झाले आहे. दिल्ली संघ सध्या सर्वाेत्तम खेळीमुळे फाॅर्मात आहे.

बातम्या आणखी आहेत...