आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • It Is Wrong To Determine A Champion From A Match; Decide The Winner From The Series Sachin Tendulkar

चॅम्पियनशिप फाॅरमॅट:एका सामन्यातून चॅम्पियन निश्चित करणे चुकीचे; सिरीजमधून ठरवा विजेता- सचिनची नाराजी

विक्रम प्रताप सिंग | मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या शुक्रवारपासून भारत अाणि न्यूझीलंड यांच्यात कसाेटीची फायनल हाेणार अाहे.

टीम इंडिया अागामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील विजयाचा प्रबळ दावेदार अाहे. मात्र, एकाच सामन्यातून अशा प्रकारे टेस्टचा चॅम्पियन ठरवण्याची पद्धतच चुकीची अाहे. यासाठी फायनल ही सिरीजसारखी व्हावी, जेणेकरून विजयी अाघाडी घेणारा संघ हा या चॅम्पियनशिपचा मानकरी ठरेल, असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला. सचिन तेंडुलकर

दिव्य मराठी इंटरव्ह्यू

फायनल ही बेस्ट ऑफ थ्रीसारखी व्हावी, यावर अापले काय मत ?
भारत अाणि न्यूझीलंड टीमने काही कसाेटी मालिका खेळून अाता फायनल गाठली अाहे. विजयाच्या अाधारे या दाेन्ही टीम्सना हा पल्ला गाठता अाला. अाता या दाेन्हीपैकी एक संघ विजेता ठरणार अाहे. मात्र, हे निश्चित करण्याची पद्धत काहीशी चुकीची वाटते. ही फायनल एखाद्या सिरीजसारखी व्हायला हवी. हा फाॅरमॅट अधिक चांगला ठरेल. सध्या वेळेमुळे हा प्रयाेग साकारणे कठीण जाईल. मात्र, याेग्य वेळापत्रकातून हा प्रयाेग यशस्वीपणे साकारला जाऊ शकताे. यासाठी अायसीसीने पुढाकार घ्यायला हवा.

इंग्लंडमधील सध्याच्या नैसर्गिक वातावरणाचा परिणाम होईल का?
नैसर्गिक वातावरणाची भूमिका ही प्रत्येक सामन्यागणिक महत्त्वाची ठरते. पावसाच्या व्यत्ययाने सामना थांबवला जाऊ शकताे. याशिवाय पिचवर पाणी साचले तर काही वेळेला सामना रद्दही करावा लागताे. अाताही अशा परिस्थितीची भूमिका महत्त्वाची ठरणार अाहे. याचा निश्चितच दाेन्ही टीम्सना फटका बसू शकताे. या ठिकाणी सध्या फायनलदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात अालेला अाहे.

नाणेफेक जिंकल्याने काेहलीला काेणता निर्णय फायदेशीर ठरेल?
हे त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून अाहे. कारण, पावसाचे वातावरण असल्यास गाेलंदाजीचा निर्णय याेग्य ठरेल. जर वातावरण पूर्णपणे स्वच्छ असेल, अशा वेळी फलंदाजी निर्णयाचा निश्चितपणे फायदा हाेऊ शकेल. त्यामुळे या परिस्थितीचा याेग्य प्रकारे अभ्यास करूनच काेहली याेग्य प्रकारचा निर्णय घेऊ शकेल.

भारताचे डावपेच कसे असतील?
टीम इंडियाकडे तीन माेठे पर्याय अाहेत. टीमने सात फलंदाज (यष्टिरक्षकासह), तीन वेगवान गाेलंदाज व एका फिरकीपटूसह खेळावे. नाही तर ६ फलंदाज, तीन वेगवान व दाेन फिरकीपटूंसह मैदानावर उतरावे. तिसरे म्हणजे ६ फलंदाज, चार वेगवान गाेलंदाज व एका फिरकीपटूला संधी द्यावी.

बातम्या आणखी आहेत...