आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:जाेकाेविक सहाव्यांदा चॅम्पियन; विक्रमात राॅजर फेडररशी साधली बराेबरी

तुरीन16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी नंबर वन टेनिसपटू नाेवाक जाेकाेविक यंदाच्या सत्रातील प्रतिष्ठेच्या एटीपी फायनल्समध्ये चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीचा किताब पटकावला. सर्बियाच्या या टेनिसपटूने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुडला सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. त्याने ७-५, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. त्याला ३८.७५ काेटींचे बक्षीस देऊन गाैरवण्यात आले. जाेकाेविक या स्पर्धेत आतापर्यंत सहाव्यांदा किताब विजेता ठरला आहे. यातून त्याने स्विस किंग राॅजर फेडररच्या सर्वाधिक सहा वेळा एटीपी फायनल्सचे विजेतेपद जिंकण्याच्या विक्रमाची बराेबरी साधली. जाेकाेविकने सात वर्षांनंतर या स्पर्धेत चॅम्पयन हाेण्याचा बहुमान पटकावला. सेलिसबरी-राजीव दुहेरीत विजेते : इंग्लंडच्या जाेए सेलिसबरीने आपला सहकारी अमेरिकन टेनिसपटू राजीव रामसाेबत पुरुष दुहेरीचा किताब पटकावला. या जाेडीने फायनलमध्ये निकाेला मेकटिक-मेट पेविचचा पराभव केला. राम-जाेएने ७-६, ६-४ ने सामना जिंकला.

बातम्या आणखी आहेत...