आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑलिम्पिक चॅम्पियन लॅमोंट जॅकब्सने वर्ल्ड अॅथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने या स्पर्धेच्या ६० मीटरमध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. इटलीच्या या २७ वर्षीय वेगवान धावपटूने हे अंतर अवघ्या ६.४१ सेकंदांत गाठून सुवर्णपदक आपल्या नावे केले. यादरम्यान वर्ल्ड चॅम्पियन क्रिस्टियन काेलमॅनला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले
तीन दिवसांचा प्रवास करून युक्रेनची याराेस्लावा चॅम्पियन
युक्रेन आणि रशिया यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या युक्रेनमधील नागरिक भयभीत झालेले आहेत. मात्र, याच युक्रेनमधील खेळाडू याराेस्लावाने आपली खेळातील आवड जपत साेेनेरी यशाचा पल्ला गाठला. तिने तीन दिवस सलग प्रवास करून बेलग्रेड गाठले. आता तिने महिलांच्या हाय जम्पमध्ये सुवर्णपदक पटकावले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.