आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:जडेजा नव्या संघाकडून खेळणार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा आॅलराऊंडर रवींद्र जडेजा आता आगामी १६ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये नव्या संघासाेबत खेळताना दिसणार आहे. त्याला चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून नारळ मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे त्याला आता या नव्या सत्रासाठी नव्या संघासाेबत करारबद्ध व्हावे लागणार आहे. यासाठी जडेजा स्वत: आयपीएल विंडाेसाठी आपले नाव देणार आहे. सध्या जडेजा आणि चेन्नई संघांमध्ये काेणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही . धाेनीने गत १५ व्या सत्राच्या सुुरुवातीलाच नेतृत्व साेडून देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची धुरा जडेजाकडे साेपवण्यात आली. मात्र, ताे या नेतृत्वात आपली छाप पाडू शकला नाही. ताे यामध्ये सपशेल अपयशी ठरला. याच दरम्यान फ्रँचायझी आणि जडेजा यांच्यात काही प्रमाणाात वितुष्ट निर्माण झाले हाेते. त्यामुळे आता त्याला दुसऱ्या संघाकडून खेळावे लागणार आहे. आता जडेजावर बाेली प्रकीयेदरम्यान सर्वांचे लक्ष असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...