आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Jai Jagdeesan's Record Innings Of 277, List A Match Team's Highest Score Of 506

विक्रम:जय जगदीशनची 277 धावांची विक्रमी खेळी,  लिस्ट ए मॅच संघाचा सर्वाधिक 506 धावांचा विक्रम

बंगळुरू6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडू क्रिकेट संघाचा २७ वर्षीय ओपनर नारायण जगदीशन याने इतिहास रचला. त्याने विजय हजारे करंडक स्पर्धेत अरुणाचल प्रदेशाविरुद्ध ‘लिस्ट ए’ क्रिकेटची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. त्याने १४१ चेंडूंत २५ चौकार, १५ षटकारांच्या मदतीने विक्रमी २७७ धावा केल्या. तामिळनाडूने ५० षटकांत २ गडी बाद ५०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात अरुणाचलचा संघ २८.४ षटकांत ७१ धावाच करू शकला आणि तामिळनाडू संघ ४३५ धावांनी विजयी झाला.

जगदीशनचा दणकेबाज विक्रम {११४ चेंडूंत द्विशतक. हे ‘लिस्ट ए’मध्ये कुठल्याही भारतीयाचे सर्वात वेगवान द्विशतक आहे. { ‘लिस्ट ए’ मध्ये सलग ५ शतके करणारा पहिला. संगकारा, पडिक्कल आणि पीटरसनच्या नावावर सलग ४ शतके करण्याचा विक्रम होता. {५०६ धावांचा सर्वात मोठा स्कोअर. इंग्लंडने ४९८ धावा केल्या होत्या. {२७७ धावा. हा विक्रम (२६८) इंग्लंडच्या अॅलिस्टरच्या नावे होता. {जगदीशन-सुदर्शनच्या ४१६ धावा. ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

७ दिवसांपूर्वी सीएसकेने रिलीज केले, ९ दिवसांत नोंदवली ५ शतके

बातम्या आणखी आहेत...