आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Jamaican Sprint King Usain Bolt Says If Coach Says, I Will Return To Track

क्रीडा:बोल्ट निवृत्तीचा निर्णय बदलू शकतो; सलग 3 ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर धावण्याची शर्यत जिंकणारा उसेन बोल्ट म्हणाला - प्रशिक्षकांनी म्हटल्यास मी ट्रॅकवर परत येईन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 वेळा जागतिक चॅम्पियन उसेन बोल्टने 2017 मध्ये लंडन जागतिक स्पर्धेनंतर संन्यास घेतला होता
  • 11 वेळा जागतिक चॅम्पियन जमैकाचा उसेन बोल्टने 2017 मध्ये लंडन जागतिक स्पर्धेनंतर संन्यास घेतला होता

जमैकाचा धावपटू आणि सलग 3 ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर धावण्याची शर्यत जिंकणारा उसेन बोल्ट (33) आपल्या संन्यासाचा निर्णय बदलू शकतो. जर त्याचे माजी प्रशिक्षक ग्लॅन मिल्स यांनी सांगितल्यात तो ट्रॅकवर परतू शकतो असे बोल्ट याने सांगितले. 8 वेळा ऑलिम्पिक मेडलिस्ट बोल्टने एका मॅगझीनला व्हिडिओ इंटरव्यूमध्ये सांगितले की, त्याचा परत येण्याचा कोणताही विचार नाही, परंतु प्रशिक्षक म्हणाल्यास सर्वकाही शक्य होऊ शकते. 

11 वेळा विश्वविजेता असलेल्या बोल्टने लंडन वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर 2017 मध्ये संन्यास घेतला होता. आपल्या अखेरच्या स्पर्धेत बोल्टने रौप्य पदक जिंकले होते.

बोल्टच्या नावावर 100 मीटर रेसमध्ये जागतिक विक्रमाची नोंद

बोल्टने 100 मीटर रेस 9.58 सेकंद आणि 200 मीटर रेसमध्ये 19.19 सेंकदात पूर्ण केली होती. हा एक जागतिक विक्रम आहे. बोल्टने 3 ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकले होते. यापैकी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 2, तर 2012 लंडन ऑलिम्पिक आणि 2016 ऑलिम्पिकमध्ये प्रत्येकी 3-3 सुवर्णपदक जिंकले होते. 

‘प्रशिक्षकावर पूर्ण विश्वास आहे’

बोल्ट म्हणाला की, "जर माझे प्रशिक्षक परत आले आणि मला म्हणाले की, पुन्हा सुरुवात करू. तर मी नकार देणार नाही. कारण मला माझ्या प्रशिक्षकावर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे, जर ते म्हणतील की, आपण पुन्हा सुरुवात करू, तर मला विश्वास आहे की, सर्वकाही शक्य आहे."

वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यापेक्षा वडील बनणे अधिक कठीण आहे

बोल्ट म्हणाला की, वडील झाल्यानंतर जीवनासोबत ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची प्रेयसी कासी बॅनेटने मे मध्ये मुलीला जन्म दिला. बोल्ट आणि बॅनेट 5 वर्षांपासून सोबत राहत आहेत. धावपटू म्हणाला की, वडील बनणे जागतिक विक्रम मोडण्यापेक्षा कठीण आहे. तो म्हणाला की, मी रात्रभर मुलीला पाहत होतो. यामुळे पहिल्याच आठवड्यात आजारी पडलो होतो. 8 जुलै रोजी बॅनेटचा वाढदिवस होता. यावेळी बोल्टने शुभेच्छा देत बॅनेट आणि मुलीचा फोटो शेअर केला होता. 

पुढच्या वर्षी होणार टोकियो ऑलिम्पिक

यावर्षी 24 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक सुरू होणार होते, मात्र कोरोनाव्हायरसमुळे ते रद्द करण्यात आले. आता पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. जर बोल्टने पुनरागमन केले तर तो टोकियो गेम्सनंतर पुन्हा संन्यास घेऊ शकतो. गतविजेत्या बोल्टवर पुनरागमनबरोबरच चांगली कामगिरी करण्याचा दबाव देखील असणार आहे. 

0