आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Jasprit Bumrah Marriage Photos | Jasprit Bumrah Wedding Latest Pictures | Jasprit Bumrah Married To Sanjana Ganesan Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संजनाचा झाला बुमराह:टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह आणि स्टार अँकर संजना गणेशन अडकले लग्नाच्या बेडीत

अहमदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
जसप्रीत बुमराहसोबत लग्न करणारी संजना टीव्ही अँकर आहे. तिने अनेकदा बुमराहचा इंटरव्हू घेतला आहे. फोटो-सोशल मीडिया - Divya Marathi
जसप्रीत बुमराहसोबत लग्न करणारी संजना टीव्ही अँकर आहे. तिने अनेकदा बुमराहचा इंटरव्हू घेतला आहे. फोटो-सोशल मीडिया
  • सोशल मीडियावर फोटो शेअर करुन दिली लग्नाची माहिती

भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह रविवारी टीव्ही अँकर संजना गणेशनसोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. बुमराहने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. बुमराह आणि संजनाने गोव्यात ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केले आहे.

बुमराहने खासगी कारणास्तव इंग्लंडविरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटीतून माघार घेण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) कडे परवानगी मागितली होती. त्यावेळेस त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, आज अखेर त्यावर शिक्कामोतर्ब झाला. बुमराहला टेस्ट सीरीजनंतर सध्या सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 सीरीजमधूनही आराम देण्यात आला आहे.

बुमराह आणि संजना गणेशन
बुमराह आणि संजना गणेशन

BCCI ने बुमराह आणि संजनाला दिल्या शुभेच्छा

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने बुमराह आणि संजनाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत लिहीले, 'बुमराह आणि संजनाला नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आयुष्यभर आनंदी रहा...'

बुमराह आणि संजना गणेशन
बुमराह आणि संजना गणेशन

मागच्या वर्षी सुरू झाल्या होत्या अफेअरच्या चर्चा

बुमराह आणि टीव्ही अँकर संजना गणेशनच्या लिंक-अपच्या चर्चा मागच्या वर्षी सुरू झाल्या होत्या. संजना मागच्या वर्षी IPL च्या एका फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती. तिने अनेकदा बुमराहचा इंटरव्हूदेखील घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...