आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान:'माझ्या मदतीने इम्रान खान पंतप्रधान झाले, पण त्यांनी देशाचा विश्वासघात केला; आता त्यांना अद्दल घडवणार'- जावेद मियांदाद

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जावेद मियांदादने इम्रान खान यांच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डत चुकीच्या लोकांची नियुक्ती केल्याचा आरोप लावला आहे

पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार जावेद मियांदाद यांनी देश आणि क्रिकेटमधील दुरावस्थेसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना जबाबदार ठरवले आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या मदतीनेच इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रदान झाले आहेत. परंतू, त्यांनी देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप मियांदाद यांनी केला आहे. तसेच, आता इम्रान यांना अद्दल घडवणार असल्याचेही ते म्हणाले.

मियांदाद यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, जर मी खोटं बोलतं असेल, तर इम्रान यांनी माझ्या वक्तव्याचे खंडन करावे.

मियांदाद यांनी इम्रान यांच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात चुकीच्या लोकांची नियुक्ती करण्याचाही आरोप लावला आहे. मियांदाद म्हणाले की, इम्रान स्वतःला देव समजत आहेत आणि वाटेल ते निर्णय घेत आहेत. त्यांना वाटत आहे की, पीसीबीला चालवण्यासाठी देशात सक्षम लोक नाहीत. त्यामुळेच त्यांनी बोर्डात विदेशी लोकांची नियुक्ती केली आहे.

इम्रान यांच्या निर्णयामुळे स्थानिक क्रिकेट बेरोजगार होत आहे

1992 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचे सदस्य मियांदाद यांनी इम्रान खान यांच्यावर स्थानिक खेळाडूंना बेरोजगार करण्याचा आरोप लावला. ते म्हणाले की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मुद्दामुन डिपार्टमेंट क्रिकेटला बंद केले. यामुळे स्थानिक खेळाडून बेरोजगार झाले.

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या स्थानिक क्रिकेटला डिपार्टमेंटल सामने म्हणतात. मागच्या महिन्यात डिपार्टमेंट क्रिकेटमधील सुई-गॅस डिपार्टमेंट टीम बंद पाडण्यात आली. यात शोएब मलिक, बाबर आजम आणि फवाद आलमसारखे खेळाडू खेळत होते. सरकारच्या या निर्णयानंतर डिपार्टमेंटच्या खेळाडूंनी प्रदर्शनदेखील केले. स्वतः इम्रान खान यांनी कधीकाळी डिपार्टमेंट क्रिकेट खेळला आहे. या क्रिकेटमधून खेळाडूंना नोकऱ्या मिळतात.

बातम्या आणखी आहेत...