आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने मंगळवारी रणजी ट्रॉफीत इतिहास रचला. त्याने दिल्लीविरोधात पहिल्याच षटकात लागोपाठ 3 बळी घेतले. यामुळे डोमेस्टिक टूर्नामेंटमध्ये पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. जयदेवने दिल्लीविरोधातील पहिल्या डावात 12 षटकांत 39 धावा काढून 8 गडी तंबूत पाठवले.
जयदेव उनाडकट नुकताच बांगलादेश दौऱ्यावरून परतला आहे. त्याने तब्बल 12 वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन करून टेस्ट करियरमधील दुसरा सामना खेळला. या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने 3 बळी घतेले. 31 वर्षीय उनाडकटने 2010 मध्ये कसोटीत पदार्पण केले होते.
मंगळवारी राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिअममध्ये दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर उनाडकटने ध्रुव शौरीचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर वैभव रावललाही हार्विक देसाईकरवी झेलबाद केले. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने कर्णधार यश ढुललाही पायचित करून सलग तिसरा बळी घेतला. याशिवाय त्याने जोंटी सिधु, ललित यादव, लक्ष्य थरेजा, शिवांक वशिष्ठ व कुलदीप यादवलाही बाद केले.
दिल्लीचा पहिला डाव 133 धावांवर गडगडला
दिल्लीचा पहिला डाव अवघ्या 35 धावांत गुंडाळला गेला. संघाने सर्वबाद 133 धावा केल्या. ऋतिक शौकीनने 90 चेंडून सर्वाधिक 68 धावा केल्या. शिवांक वशिष्ठने 68 चेंडूंत 38 धावा केल्या. सौराष्ट्राच्यावतीने जयदेवने 8, तर चिराग जानी व प्रेरक मंकडने प्रत्येकी 1 बळी घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.