आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविमेंस प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. पण या सामन्यात दिल्लीच्या जेमिमा रॉड्रिग्जच्या एका शानदार कॅचने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
संघात जेमी नावाने ओळखल्या जाणाऱ्या जेमिमाने बाउंड्रीहून जवळपास 20 मीट धावत येत समोरच्या दिशेने सूर मारत एक अवघड झेल घेतला. या शानदार कॅचची प्रशंसा समालोचन करणाऱ्या आकाश चोप्रानेही केले. त्याने हा या स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ झेल असल्याचे स्पष्ट केले.
दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 106 धावांचे टार्गेट दिले होते. मुंबई इंडियन्सने अवग्या 15 व्या षटकांतच पार केले व सामना 8 गड्यांनी आपल्या खिशात घातला.
जेमिमाच्या शानदार कॅचचा फोटो पाहा...
जेमीने सेट मॅथ्यूजला तंबूत पाठवले
मुंबईच्या डावातील 12व्या षटकातील दुसरा चेंडू अॅलिस कॅप्सने ऑफ स्टंपच्या बाहेर फेकला. या चेंडूवर हेली मॅथ्यूजला मोठा फटका मारायचा होता. पण चेंडू तिच्या बॅटवर नीट आला नाही. तो मिडऑफच्या दिशेने गेला. ते पाहून डीपवर उभी असलेली जेमिमा धावत आली आणि च जोरदार सूर मारत तिने तो आपल्या हातात पकडला. यामुळे हेलीला तंबूत परतावे लागले. तिने 31 चेंडूंत 32 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला
तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ 18 षटकांत अवघ्या 105 धावांवर सर्वबाद झाला. दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक 43, तर जेमिमाने 25 धावा केल्या.
106 धावांचे आव्हान मुंबई इंडियन्स संघाने 2 गडी गमावून पूर्ण केले. यास्तिका भाटिया व हेली मॅथ्यूज यांनी मुंबईला दमदार सुरुवात करून दिली. दोघींची 65 धावांची भागीदारी केली. मॅथ्यूज बाद झाल्यानंतर नताली सीव्हरने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत 32 धावांची भागीदारी करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला.
क्रिकेटशी संबंधित खालील वृत्त वाचा...
भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस:काळ्या पट्टी बांधून मैदानावर उतरले ख्वाजा-ग्रीन, कमिन्सच्या आईच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ आज सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजाच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मजबूत स्थिती गाठली. संघाने 4 गडी गमावून 255 धावा केल्या. ख्वाजा 104 आणि कॅमेरून ग्रीन 49 धावांवर नाबाद आहेत. दोघेही दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी उतरतील. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.