आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Johann Blocked 13 Shots, Fernandes In The 95th Minute. Manchester United Beat Copenhagen FC To Reach The Semi finals For The Second Time

युरोपा लीग:जोहानने १३ शॉट रोखले, फर्नांडिसने ९५ व्या मि. गोल करत मँचेस्टरला जिंकवले, मँचेस्टर युनायटेडने कोपेनहेगन एफसीला नमवत दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला

कोलोन/डसलडर्फएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड दुसऱ्यांदा युरोप लीगच्या उपांत्य फेरीत पोहोचला. २०१६-१७ सत्राचा चॅम्पियन मँचेस्टर युनायटेड केवळ चौथ्यांदा युरोपा लीगमध्ये खेळतोय. युनायटेडने कोलोनच्या (जर्मनी) रेन एनर्जी स्टेडियममध्ये डेन्मार्कचा क्लब कोपेनहेगन एफसीला १-० ने हरवले. संपूर्ण सामन्यात डॅनिश क्लबचा दबदबा राहिला. दुसरीकडे, इटलीचा क्लब इंटर मिलानने जर्मन क्लब बायेर लेवेरकुसेनला २-१ ने हरवत पहिल्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. इंटर मिलानसाठी निकोलो बारेलाने १५ व्या व रोमेलु लुकाकूने २१ व्या मि. गोल केले. लुकाकूने विक्रमी सलग नववा गोल नोंदवले.

जोहानचा सर्वाधिक शॉट वाचवण्याचा विक्रम
युनायटेडने गोलपोस्टवर १४ शॉट मारले, ज्यात कोपेनहेगनचा गोलरक्षक कार्ल-जोहान जाॅन्सनने १३ वाचवले. मात्र, अतिरिक्त वेळेत ब्रुनो फर्नांडिसच्या पेनल्टीला वाचवू शकला नाही. युनायटेडला या सत्रात २१ पेनल्टी मिळाले. जोहानने या लीगमध्ये सर्वाधिक शॉट वाचवण्याचा विक्रम केला.

बातम्या आणखी आहेत...