आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० क्रिकेट:मसिआ इलेव्हनकडून जॉन्सन पराभूत

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मसिआच्या वतीने आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धेत मसिआ इलेव्हन संघाने जाॅन्सन संघावर ८ गडी राखून मात केली. गरवारे क्रीडा संकुलावर रविवारी झालेल्या सामन्यात अजिंक्य पाथ्रीकर सामनावीर ठरला.

प्रथम खेळताना जॉन्सनचा डाव १७.३ षटकांत ९३ धावांवर संपुष्टात आला. सलामीवीर राघव नाईकने १५ धावा केल्या. दुसरा सलामीवीर अथर्व पुजारीने ३६ चेंडूंत ४ चौकारांसह ३४ धावा केल्या. अमर यादवने ११ व पांडूरंग धांडेने ९ धावा काढल्या. दीपक खानविलकर भोपळाही फोडू शकला नाही. मसिआकडून अजिंक्य पाथ्रीकरने भेदक गोलंदाजी करत १४ धावा देत ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. धर्मेंद्र पटेलने २ आणि रोहन राठोड, गिरीष खत्रीने प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरात, मसिआ इलेव्हनने ११.१ षटकांत २ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. सलामीवीर मुकीम शेखने २८ चेंडूंत ५ चौकार खेचत ३१ धावा काढल्या. दुसरा सलामीवीर ऋषिकेश तरडेने फटकेबाजी करत २७ चेंडूचा सामना करताना ६ सणसणीत चौकार व २ उत्तुंग षटकार खेचत ४७ धावांची खेळी केली. केतन गोडबोलेने नाबाद ३ आणि मधुर पटेलने नाबाद ७ धावांची खेळी केली. जॉन्सनकडून पांडूरंग धांडे व अथर्व पुजारीने १-१ बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...